शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांचे छायाचित्र वापरून प्रचार करणाऱ्या बंडखोरांवर कारवाई करणार - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:12 IST

बंडखोरांना तंबी

जळगाव : जिल्ह्यात भाजपाच्या काही बंडखोर उमेदवारांकडून भाजपा नेते व पालकमंत्री गिरीश महाजन यांचा फोटो वापरून प्रचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता ‘त्या’ सर्व बंडखोर उमेदवारांना प्रचारात माझा फोटो न वापरण्याचा सूचना दिल्या असून, त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.जिल्ह्यात जळगाव ग्रामीणमध्ये चंद्रशेखर अत्तरदे व चोपडा मतदारसंघात जि.प.समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तसेच दोन्ही ही उमेदवारांकडून भाजपाचे पट्टे व गिरीश महाजन यांचा फोटो लावून प्रचार केला जात आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आक्षेप घेत, भाजपा यांच्यावर कारवाई करेल का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर याबाबत भाजपा नेतृत्व गंभीर असून, प्रदेशाध्यक्षांकडून लवकरच बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. भाजपा-शिवसेनेची युती असून, दोन्हीही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी युतीधर्म पाडायलाच पाहिजे दोन्ही पक्ष याबाबत गंभीर असून, संबधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येणार असून, पक्षाच्या नेत्यांचा फोटो न वापरण्याबाबत देखील तंबी देण्यात आल्याचेही महाजन यांनी सांगितले.चंद्रकांत पाटलांवर कारवाई होईलच - संजय सावंतमुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.मात्र, शिवसेना तर युतीधर्म न पाडणाºयांवर कारवाई करणारच, भाजपाने देखील आपल्या बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असेही सावंत यांनी सांगितली.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव