ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1- देशात इतर कुणावर झाला नाही एवढा अन्याय सातत्याने शेतक:यांवर झाला. शेतमाल घरात आल्यानंतर दर पडतात. कुठले पीक पेरावे, लागवड करावी, असा संभ्रम सततच्या नुकसानीने निर्माण झाला. शेती नुकसानीत आहे. अशा स्थितीत शेतक:यांना जगावेसे वाटत नाही. शेतकरी निद्रीस्त नाही. तो शेतमालास उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने व सरकार लक्ष देत नसल्याने पुरता अडचणीत आला आहे. जो व्यवसाय करतो त्यात काही टक्के नफा हवा असतो. पण शेतीत सातत्याने नुकसानच होते. आता शेतक:यासमोर संपावर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे मत विविध संघटना, संस्थांच्या शेतकरी प्रतिनिधींनी ‘लोकमत’तर्फे आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.
1 जूनपासून शेतकरी संपावर जात आहे. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर लोकमत शहर कार्यालयात चर्चासत्र झाले. त्यात किसान क्रांती शेतकरी कृती समितीचे राज्य समन्वयक एस.बी.पाटील, कृषितज्ज्ञ वसंतराव महाजन, जगन्नाथ धनसिंग पाटील, किशोर चौधरी, डॉ.राधेश्याम चौधरी, जगतराव बारकू पाटील, देवराम पाटील, किसान सभेचे अमृतराव महाजन, संजय नारायण चौधरी, अजित पाटील, राजेश चिरमाडे, संजीव जे.बाविस्कर, सचिन प्रभाकर पवार, विवेक रणदिवे हे सहभागी झाले.
माधव भंडारींचा निषेध
शेतकरी संपाने काहीही फरक पडत नाही असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगून शेतक:यांच्या जखमांवर मीठ टाकण्याचे काम केले आहे. शेतक:यांचा अनादर केला म्हणून माधव भंडारी यांचा या चर्चासत्रात शेतक:यांनी निषेध केला.
शेतक:यांचा सातबारा कोरा करा
राज्य शासनाच्या हातात शेतक:यांना कजर्माफी व विजबिल माफी हे निर्णय आहेत. हे निर्णय तातडीने सरकारने जाहीर करावेत. कांदा, धान्य, कापूस आयात निर्यात यासह खतांवरील अनुदान घटविणे, शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करणे याच्या धोरणांवरील निर्णय केंद्राने शेतक:यांसाठी सकारात्मक पद्धतीने घ्यावेत.