शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST

युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मिळणार ‘सिस्टिम जनरेट पास’ जळगाव : हवाई प्रवास असो ...

युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मिळणार ‘सिस्टिम जनरेट पास’

जळगाव : हवाई प्रवास असो की रेल्वेद्वारे आंतरराज्य प्रवास असो किंवा माॅलमध्ये प्रवेश करायचा असेल तर यासाठी आता घरबसल्या ‘सिस्टिम जनरेट पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास कोणत्याही अधिकाऱ्याकडे न जाता स्वत:च ऑनलाइन माहिती भरून मोबाइलवर डाऊनलोड करता येणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ही पास मिळणार आहे.

कोरोना काळात प्रवास करायचा असल्यास महसूल व पोलीस प्रशासनाकडून ई-पास दिले जात होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने या पासची आवश्यकता भासत नाही. मात्र हवाई प्रवासासाठी तसेच रेल्वे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे आंतरराज्य प्रवास करायचा झाल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. या शिवाय निर्बंध हटविले असले तरी हॉटेल, किराणा व इतर सर्वच व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे सक्तीचे केले आहे. या शिवाय मॉलमध्ये प्रवेशाविषयीदेखील नवीन आदेश काढण्यात आला असून मॉलमध्ये प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही घेतल्याचे प्रमाणपत्र, फोटोसह ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे.

मोबाइलवरूनच मिळविता येणार पास

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी राज्य सरकारच्यावतीने युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आपल्या मोबाइलवरूनच ही पास मिळविता येणार आहे. ही पास मोबाइलमध्येच डाऊनलोड करून ठेवल्याने कोणत्याही प्रवासामध्ये तसेच मॉलमधील प्रवेशासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. लोकल प्रवासाच्या पाससाठी ही पास लागणार असून आपल्याकडे लोकल नसल्या तरी इतर हवाई, रेल्वे प्रवासासाठी त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.

अशी मिळवा युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास

- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.

- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.

-त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.

- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.

-त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.

-त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.

-या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.

- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.

- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी ऑटो जनरेट पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पासला सिस्टिममधूनच मंजुरी मिळते. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही.

- रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी.