शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:34 IST

भुसावळ शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवरुन गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला.

ठळक मुद्देगोंधळातच ४१ विषयांना मंजुरीसर्वसाधारणसभा ठरते केवळ औपचारिकतासर्वसाधारण सभेत सत्ताधारी-विरोधक भिडले

आॅनलाईन लोकमतभुसावळ, दि.३ : शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवरुन गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला.अजेंड्यावरील ४१ विषयांना गोंधळाच्या वातावरणातच मंजुरी देण्यात आली. दरम्यान, दरवेळी होणारी पालिकेची सर्वसाधारण सभा आता केवळ औपचारिकता म्हणून होत आहे. त्यात शहराचा विकास आणि शहरवासीयांच्या कोणत्याही प्रश्नांवर चर्चाच होत नसल्याची भावना शहरवासीयांमध्ये पसरली आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. सोबत व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर होते. प्रारंभी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी प्रकरणात क्लीनचिट मिळाल्याने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. अकरा वाजता होणारी सभा सव्वा अकरा वाजता सुरू झाली. सभेला सुरुवात होताच जनाधार विकासपार्टीतर्फे नगराध्यक्ष रमण भोळे यांना समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.सत्ताधारी-विरोधक भिडलेगुरुवारी ३ रोजीच्या सर्वसाधारण सभेत सभेत शहर विकासच्या ४१ विषयांवर चर्चा करण्यात येणार होती, परंतु आधी शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करा यावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला असताना कोणत्या भागात किती पाणी सोडले जाते. पिण्याच्या पाण्याचे नियोजन काय? किती टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येतो? कोणत्या प्रभागात पाणी सोडण्यात येते अशा अनेक प्रश्नांचा भडीमार जनाधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केला. यावर उत्तर देताना नगराध्यक्ष भोळे यांनी सांगितले की, पालिकेत एक वर्षापूर्वी एकही टँकर वापरायोग्य नव्हते. आता तीन टँकरद्वारा आवश्यकते नुसार पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पैकी एक टँकर दुर्गेश ठाकूर यांच्याच प्रभागात २४ तास पाणीपुरवठा करीत असल्याचेही भोळे यांनी सांगितले.हमरी-तुमरी अन् वादसभेच्या अजेंड्यावरील विषयांवर चर्चा न करता मधूनच हमरी-तुमरी वादाला सुरुवात झाली.नगरसेविकांमध्येही वादसभेत नेहमी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक होत होती, परंतु गुरुवारच्या सभेत नगरसेविकांमध्येही जोरदार शाब्दिक चकमक झाली. नगरसेवकांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ