शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
4
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
5
"१५ हजारांचा चाजनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
6
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
7
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
8
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
9
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
10
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
11
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
12
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
13
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
14
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
15
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
16
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
17
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
18
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
20
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी

राज्य शासनाने जळगाव मनपाच्या माथी मारलेले सहा रस्ते महासभेने नाकारले

By admin | Updated: April 29, 2017 17:14 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या मालकीतच बदल करून ते रस्ते जळगाव मनपाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 29 -  राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या दारू दुकानांसंदर्भातील आदेशाला बगल देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या मालकीतच बदल करून ते रस्ते जळगाव मनपाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याने शनिवारी झालेल्या मनपाच्या महासभेत हे रस्ते नाकारत ते शासनाने ताब्यात घ्यावेत तसेच त्यांचा विकासही करावा, असा ठराव सत्ताधारी खान्देश विकास आघाडीच्या 2 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक सदस्याचा विरोध वगळता बहुमताने करण्यात आला. एक नगरसेवक तटस्थ राहिले. विशेष म्हणजे आमदार सुरेश भोळे यांनीच रस्ते हस्तांतरणासाठी पुढाकार घेतल्याचे उघड झालेले असताना पक्षावरील टीका थांबविण्यासाठी भाजपानेही या निर्णयात खाविआ, मनसे, राष्ट्रवादीला साथ दिली. महापौरांनी हा विषय मांडत प्रत्येक सदस्याने या विषयाच्या विरोधात अथवा बाजूने आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन केले. त्यात माजी महापौर व खाविआचे नगरसेवक विष्णू भंगाळे, अजय चुडामण पाटील व राष्ट्रवादीच्या शालिनी काळे यांनी या विषयाला विरोध करीत विरोधात मत नोंदविले. तर महानगर विकास आघाडीचे नरेंद्र पाटील हे तटस्थ राहिले. त्यामुळे बहुमताने हे सहा रस्ते मनपाने नाकारत राज्य शासनाला परत करण्याचा ठराव मंजूर केला. दरम्यान, राज्य शासनाने केलेल्या रस्ते हस्तांतरणाच्या विरोधात काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने राज्य शासनाला फटकारले आहे. तसेच डॉ.चौधरी यांनी 28 रोजी स्वाक्षरी मोहिम राबविली होती. त्यात 10 हजार नागरिकांनी रस्त्यांच्या हस्तांतरणास तीव्र विरोध केला होता. या जनमताचा आदर करीत महासभेत हा ठराव करण्यात आला. काय आहे प्रकरण?सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मनपा हद्दीतील राज्य शासनाच्या मालकीच्या सहा रस्त्यांची मालकी बदलासाठी ‘लिकर’ लॉबी सक्रीय झाली होती. आमदार सुरेश भोळे यांनी त्यासाठी पुढाकार घेत शासनाला पत्रही दिले होते. त्यासाठी 2001 मध्ये तत्कालीन नगरपालिकेने केलेल्या ठरावाचा आधार घेण्यात आला होता. त्यानुसार शासनाने या सहा रस्त्यांच्या मालकीत बदल करून मनपाकडे सोपविण्याचा एकतर्फी घेतला होता. त्याविरोधात जळगावात तीव्र संताप व्यक्त होत होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 21 एप्रिल रोजी जिल्हा दौ:यावर आले असता नगरसेवकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी त्यांनी शासनाचा हा निर्णय रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे जाहीर केले होते व मनपानेही आपला निर्णय कळवावा, असे आवाहन केले होते.