शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गाय चोरीच्या संशयावरुन दोघांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:50 IST

मालवाहू वाहनासह दोघं तरुण ताब्यात

जळगाव : चोरलेल्या गायी बाहेरगावी घेऊन जात असल्याच्या संशयावरुन निलेश योगेंद्र वोनोले (२४) व दर्शन गोकुळ सोनवणे (२२) दोन्ही रा.मुक्ताईनगर, जळगाव या दोन्ही तरुणांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजता दूध फेडरेशनजवळील रेल्वे गेटजवळ घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गायी, वाहन व संबंधित तरुणांना ताब्यात घेतल्याने मोठी घटना टळली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू बिसमिल्ला पटेल (४०, रा.दांडेकर नगर, जळगाव) यांचा गुरे पाळण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे लहान मोठे मिळून ३५ गायी आहेत. या सर्व गायी गोठ्यात बांधलेल्या असतात.१ मे रोजी संजू पटेल गायींचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता दूध काढणाऱ्या अमोल महाजन याला दोन गायी गायब झालेल्या दिसल्या. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही गायी मिळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री पटली.बुधवारी सकाळी साडे दहा वाजता एका मालवाहू वाहनातून (क्र.एम.एच.१९ बी.एम.०२७२) या दोन्ही गायी जात असल्याचे गॅरेजवर काम करणारा सईद फारुख पटेल या तरुणाला दिसले.त्याने लगेच संजू पटेल यांना मोबाईलवर संपर्क करुन माहिती दिली.पटेल येण्याआधी तेथे जमलेल्या तरुणांनी वाहनातील दोन्ही तरुणांना चोपून काढले.आमदारांनी गाठले पोलीस ठाणेदिवसभराच्या घडामोडीनंतर सायंकाळी तक्रार मागे घेऊन प्रकरण आपसात मिटविण्यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही गटाची बाजू समजून घेतली. पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या दालनात बराच वेळ चर्चा चालली. पटेल यांनी फिर्याद दिली, मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता.पोलिसांचा हद्दीचा वादघटनास्थळावर वाद वाढल्याने त्यांना लोकांनी तालुका पोलीस ठाण्यात नेले. तेथे नेल्यावर घटनास्थळ हे जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने तक्रार येथे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पटेल यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. तेथील कर्मचाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात येवून गायी, वाहन व संशयित तरुणांना ताब्यात घेतले. या गायी आम्हाला दुसºयाने दिल्या असून अडावद येथे घेऊन जात असल्याने दोघांनी स्पष्ट केले. दरम्यान, या गायी बेवारस फिरत असल्याने आम्ही गोशाळेत नेत असल्याचे मालकाने सांगितले. एकूणच प्रत्येकवेळी वेगवगेळी माहिती मिळत असल्याने गुंता अधिक वाढला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव