शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

गावरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:39 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘गाव पांढरी’ या सदरात साहित्यिक रवींद्र पांढरे लिहिताहेत...

बय सांगत होती, ‘गावरान तं् गावरानच राह्यतं भाऊ. अन् तुल्हे सांगू ह्या गावरानची एवढी ख्याती काहून झाली ! काहून की हे जे हायब्रीड आलं न्ं ते निकस हाये.‘गावरान’ निकस हाये तं् हाये ते खाल्लं की, जे कधी पाह्यले नही, ऐकले नही आसे नवे नवे आजार उमळ्याले लागले भाऊ. म्हणून आता लोकं म्हन्याले लागले, गावरान पाह्यजे, गावरान पाह्यजे. तसं तं् हे हायब्रीड याच्याबी आधी ह्या ‘गावरान’ले ख्याती मिळेल व्हती ती गावरानी तुपानं. काय तुप राहे भाऊ गावरानी. कणीदार, रवाळ, पिवळं धम्मक. घमघम वास ये येचा. डोळ्यात घातलं त् डोळे चमकदार अन् नजर तेज व्हये मानसाची. गाई, म्हशीले खायालेबी तसंच भेटे भाऊ. शेंगदाण्याची सरकीची ढेप खात गाई, म्हशी. तेच्यानं दुधबी तसंच निघे, कपाळाले लाव्याच्या गंधकावानी घट. मडक्यात दही लावलं तं आसं दहि लागे, खापची खाप. लोनी काढ्याले रई लावली तं् खरंडीग ताक तं् फुकट वाटून देत गल्लीत घरोघरी. आता रई लावनारी बाई म्हनली तं् एकच दिसते भाऊ, बाळक्रिस्राची माय यशोदा, तेबी चित्रात.आता पह्यल्यावानी गावरानी तुप भेटत कां भाऊ. पह्यल्या जमान्यातलं गावरानी तुप म्हनशील तं् औषीद व्हत भाऊ औषीद. गावरानी तुप खानारं मानुस कसं तिपीतिपी तळपे, सोन्यावानी पिवळ धम्मक.‘आता काय राह्यलं रे भाऊ गावरानी. गावरानी आंबा तं् डोळ्यानं दिसत नही भाऊ. किती गावरानी आंबे व्हते भाऊ आमच्या जमान्यात. बाया मानसं, पोरंसोरं इकळून जात आंबे खाऊ खाऊ.झाडच तसे व्हते भाऊ आंब्याचे शिवारात. झाडं तं् झाडं पन ‘आमराया’ बी तशाच व्हत्या मोठ्या-मोठ्या दहा-दहा, वीस-वीस झाडांच्या आंब्याचे झाडं अन् आमराया म्हनशील तं् वैभव व्हतं भाऊ शिवारच. हे मोठमोठे झाडं, पन्नास पन्नास-साठ साठ वर्साचे एका आंब्याच्या सावलीतच आख्ख गव्हार बसे गाई वासराचं वावरात काही इहिरीच्या पान्याची शांती कऱ्याची आसली म्हना, कां काही नवस आसला म्हना तं् सयपाक पानी, जेवनं खावनं समदं आमराईच्या सावलीत उरके. आताच्यावानी कापडी मांडव घाल्याचं काम पडेना.आंबे कां आंबे व्हते भाऊ गावरानी. एकापेक्षा एक नामी.नगदीला केळ्या, देवळीतला काळ्या, मळ्यातला रोपड्या अन् सांगवीची कुयरी.एकापेक्षा एक नामी आंबे गवताच्या आढीत पिकोयेल आंब्याचा रस म्हनशील नं् तं् आसा लालजरद हि गुळावानी. घटब्बी तसाच.आमरसाचं जेवन म्हनलं तं् थोरामोठ्यांची मेजवानी व्हती. बाया शेजारनी पाजारीले छाती फुगावून कौतुकानं सांगत, इहिनच्या घरी गेल्ही व्हती तं् इहिननं् मले आमरसाचं जेवन केल्हं. ‘आता ते आढीतले पिकोयेल गावरान आंबेबी राह्यले नही अन् तो जिव्हाळाबी. आता पैशा करता लोकं ते निलमी कलमी आंबे कवळे काचेच तोडता अन् औषीदं टाकून पिकवता. त्या आंब्याच्या रसाले ना रंग ना ढंग. नही खाल्लं तेवढं चांगल.गावरान काही राह्यलं नही भाऊ आता. बारा मह्यन्याचा खार घाल्याचा म्हनलं त् खार घाल्याले बी गावरान आंबा भेटत नही. बजारात कधी इचारलं की, ‘गावरान हाये कां रे भाऊ, तं् म्हनता, गावरान काय राह्यलं बय आता, गेल्हा तो तुमचा गावरानचा जमाना, आता हा हायब्रीडचा जमाना हाये.-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर