शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

चितोड नाक्याजवळ गॅस टँकर उलटला

By admin | Updated: November 19, 2015 23:46 IST

धुळे : चितोड नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) कंपनीचा गॅस टॅँकर उलटला.

धुळे : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यावर असणा:या चितोड नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) कंपनीचा गॅस टॅँकर उलटला. चालकाचे टॅँकरवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. त्यात सुदैवाने गॅस गळती झाली नाही. हा टॅँकर उचलण्याचे काम रात्री उशिरार्पयत सुरू होते. पोलीस प्रशासनाने या कामासाठी उच्च क्षमतेचे दोन क्रेन मशीन घटनास्थळी मागवले होते.

गुजरात राज्यातील हाजिरा येथे असणा:या प्लॉन्टमधून गॅस भरून (एमएच 46 एच 3406) क्रमांकाचा टॅँकर (कॅप्सूल) अहमदाबादमार्गे औरंगाबादला जाण्यासाठी निघाला होता. या टॅँकरमध्ये सुमारे 18.5 टन इतका लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस भरलेला होता. नागपूर-सुरत महामार्गावर धुळे शहरानजीक चितोड नाका परिसरात आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टॅँकर अचानक रस्त्याच्या कडेला उलटला. या घटनेची माहिती होताच पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव हे सहकारी अधिकारी व कर्मचा:यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला नागरिकांना गॅस टॅँकरपासून दूर केले. त्यानंतर टॅँकरच्या प्रेशर गेजची तपासणी करून गॅस गळती होत आहे किंवा नाही, याची खात्री केली. गॅस गळती होत नसल्याचे दिसल्यानंतर टॅँकर उचलण्यासाठी शहरातून दोन क्रेनमशीन मागविण्यात आल्या. रात्री उशिरार्पयत हे काम सुरू होते. या घटनेची माहिती कंपनीच्या अधिका:यांना देण्यात आली आहे, असे पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.