शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दापाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 19:51 IST

आठ जणांना अटक :३ लाख रुपये रोख, दोन चारचाकी, चाकू, मोबाईल, मिरची पूड आदी साहित्य जप्त

भुसावळ : शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आठ जणांचा समावेश असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा बाजारपेठ पोलिसांनी पर्दापाश केला. टोळीकडून पोलिसांनी ३ लाख रुपयांची रोकड, दोन चारचाकी, चाकू, मोबाईल, मिरची पूड असे साहित्य जप्त केले आहे.ही घटना १७ रोजी बुधवारी पहाटे १.२५ वाजता घडली.दोन चारचाकी वाहनांसह ७ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार १७ रोजी पहाटे १.२५ वाजेच्या सुमारास शहरात पांढºया रंगाची एमपी पासींग असलेल्या चारचाकी वाहनात सहा ते सात संशयीतांनी दरोडा टाकून त्यात लुटलेले रोख ३ लाख रुपये ते आपआपसात वाटप करणार होते व नंतर ते महामार्गावरुन येणारी- जाणारी वाहने अडवून दरोडा व चोरी करणार असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उप निरिक्षक दत्तात्रय गुळींग, सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, तस्लिम पठाण ,पोलीस नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, संजय भदाणे, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर,प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, संदीप परदेशी आदींनी मिळालेल्या माहितीनुसार संशयिताचा शोध सुरु केला. शोध घेत असतांना पोलीस कर्मचारी न्यू. पंजाब खालसा ढाब्यावर गेले असता त्या ठिकानी चारचाकी क्र. क्र.एमपी- १० सीए- २०८३ ही उभी असलेली दिसली. त्या वाहनातील इसम जेवणा करताना दिसले.आरोपी हेच असल्याची खात्री झाल्याने त्यांना जागीच अटक करण्यात आली. त्यातील काही जण पोलीस आल्याचे पाहिल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्या सर्वांना जागीच पकडण्यात आले.पोलिसांनी त्यांना आठ जण एका वाहनात कसे याबाबत विचारले असता त्यांनी वाहन क्र. एमएच-३० एएफ-४२०२ ही देखील सोबत आणली असल्याचे सांगितले. वाहनांची झडती घेतली असता १ लाख रुपये किमतीची चारचाकी व्हीस्टा कं.ची कार एमपी १० सीए २०८३, ३ लाख लाख रुपये किमतीची कार एमएच ३० एएफ ४९०२, चाकू, दोन सुरे, ८० रुपये किमतीची लालरंगाची लोखंडी पकड, ६० रुपयांचा काळ्या रंगाचा स्क्रू-ड्रायव्हर, प्लॅस्टिक पिशवीत लालरंगाची मिरची पावडर, ५० फूट लांब सुती दोरीचे बंडल, २१ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल जप्त करण्यात आले.पोलिसांनी त्यांना ३ लाख रुपयांबाबत विचारले असता त्यांनी १६ रोजी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावर खंडवा येथील पासी नावाच्या व्यापाºयाला लुटल्याचे सांगितले. आठही आरोपींविरुद्ध गुरनं. २३५/२०१९ भादंवि कलम ३९९,४०२ सह आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपास सहाय्यक फौजदार आंबादास पाथरवट करीत आहे.असे आहेत आरोपीदरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील आरोपी या प्रमाणे आहेत. डिगंबर वासुदेव कुचके (४२) रा. हाथा ता. बाळापूर जि. अकोला, संतोष सुकलाल करमा (४०) रा.सनावद ता.बडवा जि.खरगोन (म.प्र), दिलीपसिंग नथ्थूसिंग चव्हाण (४०) रा.सनावद ता.बडवा जि.खरगोन (म.प्र), नारायणसिंग गोकुलसिंग राजपूत (४४)रा.टोकसर ता.बडवा जि.खरगोन (म.प्र), नाना जगन सोनी (३७) रा.सनावद ता.बडवा जि.खरगोन (म.प्र), नंदलाल हरिप्रसाद विश्वकर्मा (४६) रा.खडका ता.भुसावळ, शेषराव पांडुरंग राठोड (४७) रा.शिरसोली ता. तेल्हारा जि.अकोला, अकबर उस्मान तंबोली (३५) रा.बिंदिंया नगर खडका ता. भुसावळ.