शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडला गणेशोत्सव व मोहरम एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:22 IST

शेकडो वर्षांची परंपरा असलेला मोहरम सण तसेच गणेशोत्सवाला सुरवात होत असून, यंदाही दोन्ही सण एकत्र आले आहेत.

ठळक मुद्दे१२० वर्षांची परंपरा असलेला मोहरमवाजंत्री, मिरवणुकीला प्रतिबंध, गर्दी केल्यास होणार कारवाई

गोपाळ व्यासबोदवड : शेकडो वर्षांची परंपरा असलेला मोहरम सण तसेच गणेशोत्सवाला सुरवात होत असून, यंदाही दोन्ही सण एकत्र आले आहेत.२२ पासून गणेशोत्सव, तर २७ पासून मोहरमच्या उत्सवाला सुरवात होत आहे. पण यंदा दोन्ही सणांवर कोरोनामुळे विरजण पडले आहे.शहरात १२० वर्षांची परंपरा मोहरम सणाला आहे. दरवर्षी मोहरमनिमित्त बोदवड शहरात दोनशे वर छडी (सवाऱ्या) बसवण्यात येतात. यात सर्वाधिक हिंदू बांधवांच्या १२० वर तर मुस्लीम बांधवांच्या ८० बसवल्या जातात. यात लाखो रुपयांची उलाढाल होऊन हजारोंना रोजगार मिळत असतो. अनेकांची श्रद्धा असल्याने नवस फेडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दरवर्षी बाहेरच्या गावाहून येणाºयांची संख्या अधिक आहे.गणेशोत्सवही यंदा लॉकडाऊनच्या नियमांत अडकला असून बोदवडला १७ मंडळे तर तालुक्यात ३५ मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्यावरही प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यंदा आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीला बंदी असून गर्दी तसेच आरास देखावे यावरही प्रतिबंध आहे. बाप्पाच्या आरतीला ही फक्त दोन ते तीन सदस्य असावे. त्यातही सुरक्षित अंतर ठेवावे. या नियमानुसार बाप्पालाही लॉकडाऊन व्हावे लागले.गेल्या चार दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, तहसीलदार हेमंत पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक झाली. त्यात सर्व गणेशोत्सव मंडळ तसेच मोहरम कमिटी सदस्य यांना प्रशासने नियम पाळून उत्सव साजरे करण्यावर भर देत नियमावली दिली आहे. या नियमावलीत मोहरम व गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBodwadबोदवड