शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात आरास पाहण्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी, पावसाने उत्साहावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 12:14 IST

विविध आरासची भुरळ

जळगाव : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने गणरायाच्या दर्शनासह सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आरास पाहण्यासाठी शुक्रवारी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. सायंकाळी ५ वाजेपासून भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. रात्री आठ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली तरी भाविकांची गर्दी कायम होती. मात्र रात्री साडेनऊ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले.गणेशोत्सवाचा शुक्रवारी नववा दिवस होता़ अवघ्या दोन दिवसांवर विसर्जन असल्याने सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबियांसह नागरिकांनी गर्दी केली़ गर्दीचा अंदाज घेवून नियोजन करण्यात आले होते़ शहरातील मध्यवर्ती भागातील सार्वजनिक मंडळातर्फे सायंकाळी पाच वाजेपासूनच देखावे खुले करण्यात आले होते.सायंकाळपासून शहरात नागरिकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली़ नवीपेठेतील मंडळाजवळ खेळणे, बेन्टेक्सच्या वस्तूंसह खाद्यपदार्थाची दुकाने थाटली होती़ या दुकानांवर नागरिकांची गर्दी दिसून आली़नेहरु बहुद्देशीय मंडळ, जय गोविंदा मित्र मंडळ, नवीपेठ, जय गणेश मित्र मंडळ, पंचरत्न मित्र मंडळ तसेच जनता बँकेचा गणपती हे सर्व शहरातील मध्यवर्ती भागात आहे़ या ठिकाणच्या मंडळासमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोर्ट चौकापासून ते टॉवर चौकापर्यंतचे तसेच कोर्ट चौक ते चित्राचौकापर्यंतचे रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती. नवीपेठेला नागरिकांच्या गर्दीने यात्रेचे स्वरुप आले होते़ नजर जाईल तिकडे गर्दीच गर्दीच दिसून येत होती़पावसामुळे पळापळरात्री आठ वाजेच्या सुमारास बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली तरी देखील गणेशभक्तांची गर्दी कायम होती. मात्र रात्री साडेनऊ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक जण मंडळाच्या मंडपामध्येच थांबून होते तर कोणी गोलाणी मार्केट, नवीपेठेतील दुकानांचा आसरा घेत होते. अनेकांनी ओले होतच घरी जाणे पसंत केले.आज शेवटचा दिवसगणेशोत्सवातील शनिवार हा शेवटचा दिवस असून व त्यात ‘वीकेण्ड’ असल्याने गणेश भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून शहरातील गणेश मंडळामध्ये नागरीकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.आकर्षक रोशणाईने वेधले लक्षनेहरु चौक मित्र मंडळाच्यावतीने शुक्रवारी रात्री आराससमोर लेझर लाईट, शार्प लाईट, फोक मशिन (कृत्रिम धूर) यांचा वापर करून आकर्षक रोशनाई केली होती. या रोशनाईने लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव