शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Ganesh Chaturthi 2018 : संस्कृती, परंपरा, खेळ, उत्सवाचा संगम असलेल्या ‘गोफ’ कलेचे जळगावात जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:23 IST

आगळा वेगळा गणेशोत्सव

ठळक मुद्देसार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कलेचे पुनरुत्जीवनगणेशोत्सवात घडते व्यवस्थापनाचे दर्शन

जळगाव : संस्कृती, परंपरा, खेळ व उत्सवाचा संगम असलेल्या ‘गोफ’ या पुरातन काळापासून परंपरा असलेल्या कलेचे जळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अद्यापही जतन केले असून त्याद्वारे गणेशोत्सवातून भारतीय संस्कृतीची ओळख पटवून दिली जात आहे. मंडळाच्या या अनोख्या गणेशोत्सवातून शहरातील मुला-मुलींना एकप्रकारे व्यवस्थापनाचेही धडे दिले जात आहे.महाभारतात उल्लेख असलेली गोफ ही कला तशी पश्चिम महाराष्ट्रात अधिक दिसून येते. मात्र जळगावातील खान्देश मिलमध्ये कामानिमित्त आलेल्या त्या भागातील कामगारांसोबतच ही कला जळगावात आली. त्यामुळे जळगावातही या कलेला शतकोत्तर परंपरा आहे. मात्र मध्यंतरी ती बंद पडली. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेत या परंपरेचे पुनरुत्जीवन केले. यासाठी मंडळाने जुन्या काळातील मंडळींकडून याची माहिती जाणून घेत ती कला मुला-मुलींना शिकविली.गणेशोत्सवात घडते व्यवस्थापनाचे दर्शनआजकालच्या पिढीला लाखो रुपये खर्च करून व्यवस्थापनाचे शिक्षण दिले जाते. मात्र मुळातच आपल्या या गोफ कलेत व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण दिसून येते. किमान ५० जण हलगीच्या तालावर गोफ गुंफतात व त्यातून दोर तयार होतो. असे करीत असताना ५० जणांमधील प्रत्येकाला अत्यंत नियोजनबद्धरित्या एकमेकांना मदत करीत तो विणत जावा लागतो. यासाठी ताल, एकाग्रता, संघ भावना गरजेचे असणे अत्यंत गरजेचे असतेच सोबतच नाचताना एका सुरात, तालात स्वत: विणत असताना दुसऱ्याही संधी द्यावी लागते. त्यामुळे उत्तम व्यवस्थापन या कलेतून दिसून येते.आयुष्यभराची शिदोरीगोफ गुंफताना आजूबाजूला कितीही गर्दी असली तरी एकाग्रता ढळू न देता गोफ विणल्यास तो व्यवस्थित पूर्ण होतो. विशेष म्हणजे यासाठी शहरातील सात ते १२ वर्षातील मुलीदेखील उत्साहाने सहभागी होतात. एवढ्या कमी वयात एकाग्रतेची शहरातील मुलींना सवय लागल्याचे आगळे चित्रही या निमित्ताने दिसून येते. लहान वयापासूनच एकाग्रता, संघभावना, व्यवस्थापनाचे धडे यातून मिळाल्याने आयुष्यभर ती सवय लागते व शेवटपर्यंत ही शिदोरी सोबत असते, असे मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी सांगितले.ही कला जोपासताना कोणत्याही डीजी अथवा आधुनिक संगीत साधनांची गरज पडत नाही तर पारंपरिक वाद्यावरच ती जपली जाते. त्यामुळे या कलेतून शहरवासीयांना पारंपारिक वाद्याचेही दर्शन या निमित्ताने घडत असते.दुर्मीळ परंपरचे जतनकाळाच्या ओघात अनेक भारतीय परंपरा लोप पावत आहेत. आपल्या परंपरांमधीलच गोफ ही एक अनोखी परंपरा असून ती फारसी कोठे दिसत नाही. राज्यात पश्चिम महाराष्ट्र वगळता इतरत्र ती दिसत नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. मात्र या दुर्मीळ परंपरचे गणेशोत्सवातून जतन करण्याचा प्रयत्न जळगावात होत असल्याने ही मोठी बाब म्हणावी लागेल, असे सचिन नारळे म्हणाले.लोकाश्रय मिळणे गरजेचेही परंपरा नष्ट होत असून ती टिकविण्यासाठी तिला लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. यासाठी गणेश विसर्जनात ही कला दिसणार तर आहेच, मात्र शहरात होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमात या कलेला स्थान दिल्यास मुले-मुली हिररीने सहभागी होतील व कलेलाही लोकार्षय मिळेल, असा विश्वास सचिन नारळे यांनी व्यक्त केला.गोफ ही आपली पारंपरिक कला असून तिचे जतन गणेशोत्सातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरात बंद पडलेली परंपरा आम्ही पुन्हा सुरू केली असून यातून एकाग्रता साधण्यास मोठी मदत होते व उत्सवासह खेळही होऊन व्यायाम होतो.- सचिन नारळे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव