शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात १ लाख प्लॅस्टिक बाटल्यांपासून दीड एकरावर साकारणार गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:16 IST

डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाचा प्रकट कार्यक्रम व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने पाण्याच्या रिकाम्या १ लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून एकलव्य क्रीडासंकुलाच्यादीड एकर क्षेत्रावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे३६ तासात होणार म्युरल१ लाख प्लॅस्टिक बाटल्यांचे संकलन‘केसीई’चे विद्यार्थी करणार विक्रम

जळगाव : डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाचा प्रकट कार्यक्रम व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने पाण्याच्या रिकाम्या १ लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून एकलव्य क्रीडासंकुलाच्यादीड एकर क्षेत्रावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात येत आहे. ३६ तास चालणाऱ्या या म्युरलच्या निमित्ताने एशिया बुक आॅफ रेकॉर्ड होणार असल्याची माहिती केसीईच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी शुक्रवारी मू.जे.महाविद्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली.के.सी.ई.सोसयटीच्या ओजस्विनी फाईन आर्टस्, एकलव्य क्रीडा संकुल, मुलींचे व मुलांचे वसतीगृह, अध्यापक विद्यालय, ओरिआॅन सीबीएसई स्कूल, ओरिआॅन इंग्लिश मीडियम स्कूल,ए.टी.झांबरे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाºयांनी प्लॅस्टिकच्या एक लिटरच्या एक लाख बाटल्यांचे संकलन केले आहे.एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात येणार आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून १२ रोजी दुपारी १२ या दरम्यान ५० स्वयंसेवक हे दीड एकर क्षेत्रावर हे म्युरल तयार करणार आहेत. या उपक्रमास दिल्ली येथील ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् व फरिदाबाद येथील ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्डस्’ या संस्थांची कायदेशीर मान्यता घेण्यात आली आहे. यासाठी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून डॉ.ममता काबरा व त्यांचे सहकारी उपस्थित राहतील.

टॅग्स :Jalgaonजळगाव