शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

प्रवाशांच्या जिवाशी खेळ ! धोकादायक प्रवास

By admin | Updated: May 31, 2014 08:15 IST

खाजगी लक्झरी बसमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांनी कसे बाहेर पडावे याबाबत बस सुरू होण्यापूर्वी कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने खाजगी बसमालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तीन वर्षात लक्झरी बसने पेट घेतल्याच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत.

जळगाव : खाजगी लक्झरी बसमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांनी कसे बाहेर पडावे याबाबत बस सुरू होण्यापूर्वी कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याने खाजगी बसमालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तीन वर्षात लक्झरी बसने पेट घेतल्याच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत.प्रवाशांना दिल्या जात नाहीत सूचनाउपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्झरी आणि खाजगी बस सेवा देताना बसमध्ये पब्लिक अँड्रेसेस सिस्टीमचा वापर करण्याची सूचना केली आहे. यात बसचालक व मालकांनी प्रवास सुरू होण्यापूर्वी आपत्कालीन दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे. त्याचा वापर कसा करावा. बे्रकेबल काच असल्यास ते फोडण्यासाठी लागणारी हातोडी कोणत्या ठिकाणी आहे. वाहनात अग्निशमन यंत्र कोठे आहे. त्याचा उपयोग कसा करावा याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. यासह आपत्कालीन दरवाजावर रात्रीच्या वेळी चमकणारे स्टीकर लावण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र याकडे बसचालकांचे दुर्लक्ष झालेले आहे.इंधन टाकी मध्यवर्ती ठिकाणी असावीकाही महिन्यांपूर्वी हैद्राबाद रस्त्यावर खाजगी बसची इंधन टाकी फुटून लागलेल्या आगीत ४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावर नॅशनल ऑटोमोटीव्ह टेस्टींग आर ॲण्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ने (एनएटीआरआयपी) एक अहवाल सादर केला होता. त्यात इंधन टाकी बसच्या बाजूला बसविण्याऐवजी मध्यवर्ती भागात बसवावी, यावर भर दिला आहे. याकडे अद्याप कुणीही लक्ष देण्यास तयार नाही.चालक व वाहकाला प्रशिक्षणाचा अभावखाजगी किंवा शासकीय बससेवेतील कर्मचार्‍यांना आपत्कालीन प्रसंगी काय करावे, याचे प्रशिक्षण अजूनही दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. बसचालक आणि वाहक यांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण सक्तीचे करणे गरजेचे आहे.साहित्य तपासणीकडे दुर्लक्षखाजगी ट्रॅव्हलचालकांकडून लग्नसराई आणि दिवाळीच्या सु˜ीच्या काळात प्रवाशांकडून दुप्पट भाडे वसूल केले जाते मात्र त्या प्रमाणात सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. जळगावातील खाजगी किंवा शासकीय अशा कोणत्याही बसमध्ये साहित्य तपासणी केली जात नाही. त्यामुळे खाजगी बसमध्ये रॉकेल, पेट्रोल व गॅसची वाहतूक सहज होत असते. ज्वलनशील साहित्याची तपासणी करण्याकडे बसचालक व वाहक दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार रोज होत आहे.