शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

‘गेम आॅफ थ्रोन्स... २०१९’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:04 IST

गेम आॅफ थ्रोन्स’ ही केवळ एक परदेशी मालिका आहे असं नव्हे. तो एक असा खेळ आहे, जो इतिहासात अनेकदा, ...

गेम आॅफ थ्रोन्स’ ही केवळ एक परदेशी मालिका आहे असं नव्हे. तो एक असा खेळ आहे, जो इतिहासात अनेकदा, अनेक ठिकाणी, अनेकांनी प्रत्यक्ष खेळला आहे. आणि पडद्यावर दिसतो तेवढाच तो खेळ प्रत्यक्षातही धूर्त आणि निर्मम आहे. कालापरत्वे शस्त्रे बदलली.. पूर्वी तलवार होती, मग मतपत्रिका आली; आता ईव्हीएम आहे. ‘जी ओ टी’ तोच! हा 'गेम' आता लोकशाहीचा एक अपरिहार्य भाग आहे. एक डाव खेळण्याची संधी आपल्याला, सर्व मतदारांना कधीतरी मिळते. भारतात २०१९ चा 'सीझन' कालच संपला .....या निवडणुकीचं वर्णन बहुतेकांनी 'वेगळी' असं केलंय. तशी प्रत्येकच निवडणूक आधीपेक्षा वेगळी असतेच. मग या निवडणुकीचं सामान्य मतदारासाठी असलेलं वेगळेपण कोणतं? मतदार म्हणून मला जाणवलेल्या गोष्टी अशा ....पहिली गोष्ट म्हणजे, सोशल मीडियाचा झालेला प्रचंड वापर. उमेदवारांचा मतदारांशी किंवा मतदारांचा एकमेकांशी संपर्क या माध्यमांतून सतत होत राहिला. त्यामुळे मतदारांच्या मनात नक्की काय आहे, याचा अंदाज खरं तर कोणीच बांधू शकले नाही.सोशल मीडियावर कोणाच्याही बाजूने आणि विरोधातही इतक्या ढिगाने पोस्ट असायच्या, की त्या आधारे कसलाही निष्कर्ष निघू शकत नव्हता. आताही, लागलेल्या निकालाचं 'विश्लेषण' सगळ्यात जास्त फेसबुक अन ट्वीटरवरच सुरू आहे. दुसरं - या निवडणुकीच्या प्रचारात वैयक्तिक टीकेची पातळी 'न भूतो...' घसरली हा सगळ्यांचाच आक्षेप आहे. पण अर्थातच, प्रत्येकाच्या मते विरोधी विचारसरणीच्या लोकांनीच ही पातळी सोडली.आपापले नेते सगळ्यांनाच 'गुणाची बाळं' वाटतात. पण परस्पर चिखलफेकीचा परिणाम असा झाला की कित्येक नेत्यांच्या घरापर्यंत आणि कुटुंबीयांपर्यंत तो चिखल पोहोचला. यात उत्साही नेटकऱ्यांचे योगदानही फार मोठे आहे. या सगळ्यापेक्षा खेदजनक बाब अशी की, आपल्या चुका, पराभव हे कोणी मान्यच करत नाही. उलट त्याचं समर्थन करताना सगळे दिसतात. मोदी या एका व्यक्तीला हटवणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन विरोधी पक्ष चालला. हे लोकांना आवडेल, असं त्यांनी गृहित धरलं.. किंबहुना, आवडलंच पाहिजे ही उर्मट अपेक्षा ठेवली. त्याचे परिणाम निकालात दिसले. पण, गंमत म्हणजे अजूनही अनेक नेते, प्रवक्ते आणि हो, पत्रकारही बेदरकारपणे टी.व्ही. वर सांगतात की या सरकारचे अपयश लोकांच्या लक्षात आलेलं नाही. काही दिवसांत याचे परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत.?..वगैरे. या देशातल्या मतदाराला अक्कल नाही का? साºया देशाने एकमुखाने दिलेला जनादेश बिनकामाचा आहे? एका पक्षाला सत्ता दिली तर 'प्रगल्भ लोकशाही' आणि त्यांनीच दुसºया पक्षाला दिली तर 'दुर्दैवी निर्णय!' वा रे विचारवंत! काही 'घटनेच्या संरक्षकांनी' तर आमचे नेते निवडून आले नाहीत तर हिंसाचार अटळ आहे ही निलाजरी धमकी दिली. याचा अर्थ स्पष्ट आहे. या लोकांचा प्रत्यक्षात लोकशाहीवर विश्वासच नाहीये. एका अशाच माजी पत्रकाराने तर आज 'दारावर गेल्यासारखी' पोस्ट टाकलीय की तो या ( दु:खद?) प्रसंगी अल्पसंख्य बांधवांसोबत आहे ! या बौद्धिक दहशतवाद्यांची आपल्यासारख्या सामान्य माणसांबद्दलची तुच्छता या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आली, हे एक वैशिष्ट्य आहे.निवडून आलेल्या उमेदवारांचं, पक्षाचं निर्भेळ अभिनंदन करणं आणि जनादेश स्वीकारणं, ही आता कालबाह्य गोष्ट झालीय. हे चांगलं का वाईट, ते तुम्हीच ठरवा!प्रत्येकाच्या मते विरोधी विचारसरणीच्या लोकांनीच ही पातळी सोडली. आपापले नेते सगळ्यांनाच 'गुणाची बाळं' वाटतात. पण परस्पर चिखलफेकीचा परिणाम असा झाला की कित्येक नेत्यांच्या घरापर्यंत आणि कुटुंबीयांपर्यंत तो चिखल पोहोचला. यात उत्साही नेटकऱ्यांचे योगदानही फार मोठे आहे.अ‍ॅड.सुशील अत्रे, (वरिष्ठ फौजदारी वकील)

टॅग्स :Jalgaonजळगाव