शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जुगाराचा डाव उधळला; २७ जण जाळ्यात, एक लाख ६७ हजार रुपयांची रोकड ताब्यात

By विजय.सैतवाल | Updated: October 10, 2023 00:03 IST

चार दुचाकी, मोबाईल जप्त; एलसीबीची कारवाई

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: नेरी नाका परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी छापा टाकला. त्या ठिकाणाहून एक लाख ६७ हजार रुपयांच्या रोकडसह चार दुचाकी जप्त करुन २७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेरीनाका परिसरात मोठा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ राजेश मेढे, महेश महाजन, किरण चौधरी, श्रीकृष्ण देशमुख, भगवान पाटील, पोकॉ हरिष परदेशी या पथकाने नेरीनाका परिसरात असलेल्या जुगार अड्ड्यावर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास छापा टाकला. तेथे असलेल्या एकेकाला ताब्यात घेण्यास सुरूवात केली. एकामागून एक अशा २७ जुगारींना जुगाराच्या खेळातून उचलून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून घोळातील रोख  एक लाख ६७ हजार रुपये रोख रक्कम चार दुचाकी व १८ मोबाईल जप्त केले. सर्व जुगारींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत अटकेसह कायदेशीर कारवाई सुरु होती.

अधिकाऱ्यांशी साधला जाऊ लागला संपर्क

मोठ्या राजकीय व्यक्तीचा वरद हस्त असल्याचे सांगत हा जुगार अड्डा चालवला जात होता. एक अधिकारी, पाच कर्मचारी अशा मोजक्याच पथकाने सुरुवातीला छापा टाकला असता पोलिसांना पाहून जुगाऱ्यांनी धुम ठोकली. मुख्य बाजारपेठेचा परिसर असल्याने जो-तो पळू लागल्याने काही वेळ गोंधळ उडाला. जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोशल क्लबच्या नावाने जुगार चालवला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्या संदर्भात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही काहींनी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी