शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शनगरात घरफोडी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:26 IST

एलसीबीची कारवाई : तीन जणांना अटक

जळगाव : शहरातील आदर्श नगर भागातील रवींद्र नगरात वास्तव्यास असलेल्या कोमल सत्यनारायण पिंकुरवार यांच्या बंद घरातून सुमारे साडेदहा हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ समीर हमीद काकर, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, दीपक शांताराम रेणूके (सर्व रा़तांबापूरा) अशी त्या चोरट्यांची नावे आहेत़एरंडोल येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कोमल पिंकुरवार ह्या रवींद्र नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ दरम्यान, त्या २१ जून रोजी वडीलांसोबत परभणी येथे गेल्या होत्या़ तर पती वर्धा येथे नोकरीला असल्यामुळे घरी कुणीही नव्हते़ हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात दहा हजार रूपये रोख व पाचशे रूपये किंमतीचे एक भार वजनाचे चांदीचे पायातील जोडवे चोरून नेले होते़ त्यानंतर १७ जुलै रोजी ही घटना उघडकीस आली होती़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़अन् त्याने सांगितले साथीदारांची नावदरम्यान,पोलिसांना रविंद्र नगरात घरफोडी करणारी टोळी ही तांबापुरातील असून त्यातील एक चोरटा हा गवळी वाड्यात असल्याची माहिती गुरूवारी मिळाली़ त्यानंतर समीर हमीद काकर यास गवळी वाड्यातून अटक करण्यात आल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देवून ती चोरी मोहनसिंग बावरी व दीपक रेणूके यांच्या मदतीने केल्याचे सांगितले़ त्यानुसार मोहनसिंग याला तांबापुरातून तर दीपक याला गणपतीनगरातून अटक करण्यात आली.चोरीची दिली कबुलीया चोरट्यांनी रवींद्र नगरात चोरी केल्याची कबुली दिली आहे़ त्याचबरोबर आदर्शनगरातीलच रहिवासी विनित रमण पाटील यांच्या घरातही चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे़ चोरट्यांकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे़ विशेष म्हणजे, या टोळीने आदर्शनगरात सुमारे चौदा ते पंधरा घरफोड्या केल्याचा संशय पोलिसांना आहे़ लवकरच याचा उलगडा होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव