शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे आज गैबनशहा बाबांचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:32 IST

वरगव्हाण येथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या गैबनशाह बाबांचा यात्रोत्सव १९ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे.

बिडगाव, ता.चोपडा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या गैबनशाह बाबांचा यात्रोत्सव १९ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी कव्वालीचाही मुकाबला रंगणार आहे.वरगव्हाण येथील प्रसीद्ध असलेला गैबनशा बाबांचा यात्रोत्सव म्हणजे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. दोन्ही समाजांसाठी येथील यात्रा म्हणजे एखाद्या सणाप्रमाणे एकजुटीने साजरा केला जातो. यात्रेच्या आदल्या दिवशी येथे ग्रामस्यांमार्फे बाबांच्या दर्गावर गावातून वाजत गाजत संदल मिरवणूक काढून चादर चढवली जाते. येथील गैबनशा बाबांचा दर्गा प्राचीन आहे. लोकांची अतोनात श्रद्धा असलेल्या या दर्गावर येवून लोक नवस मानतात व इच्छापूर्ती झाल्याने यात्रेच्या दिवशी नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होत असते. यात कोणी लाडू, साखर तुला, पेढा, जिलेबी तुला करून नवस फेडतात. ग्रामस्थांच्या नातेवाईकांसह विविध ठिकाणाहृण येथे भाविक येत असतात. यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. गावातील मंदिर मज्सितसह धार्मिक स्थळांवर आर्कषित रोषणाई करण्यात आली आहे. विविध दुकानेही थाटली आहेत. बच्चे कंपनीसाठी आर्कषक झुलेही गावात दाखल झाले आहेत. विविध खाद्य पदार्थ, खेळणी, आभूषणे, मिठाई, विविध संसारोपयोगी वस्तू अशा अनेक विक्रेत्यांनी गावात आपली दुकाने थाटली आहेत.गावात येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी लतिब अजमेरी टी.व्ही गायक अजमेरी (यु.पी.) व रोशनी बारसी टी.व्ही गायक मुंबई यांच्यात कव्वालीचा मुकाबला आयोजित केला आहे. यात्रेत बंदोबस्तासाठी अडावद पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. यात्रा यशस्वीतेसाठी हिंदू-मुस्लीम पंच कमेटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमChopdaचोपडा