शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

लोकसभा निवडणुकीमुळे वायदे बाजाराची चलती : सरकारचे नियंत्रण नसल्याने महागाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:25 IST

धान्यासह डाळी, खाद्य तेलाचे चढते भाव

जळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे सरकारचे बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून वायदे बाजाराची चलती आहे. त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहे. दीड महिन्यात गव्हाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने तर डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. या सोबतच शेंगदाणा तेलाचे भावदेखील ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढल्याने गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले आहे.१० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशभरात वेगवेगळ््या टप्प्यात विविध राज्यांमध्ये मतदान सुरू झाले. यात आता शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होत असून या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारचे बाजारपेठेवरील नियंत्रण कमी झाल्याने त्याचा पुरेपूर फायदा वायदे बाजारातील मंडळी घेऊ लागले. त्यामुळेच दीड महिन्यातील महागाईचा आकडा पाहिला तर धान्याची चांगली आवक असली तरी त्यांचे भाव वाढू लागले.पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न तर प्रशासन तयारीत व्यस्तअनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवण्यासाठी साधारण मार्च महिन्यापासून धान्याची खरेदी करतात. त्यानुसार मार्च महिन्यापासून गव्हाला मागणी वाढली. असे असली आवक चांगली असल्याने गव्हाचे भाव एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत स्थिर राहिले. मात्र या काळात सत्ताधारी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीत कंबर कसून उतरल्याने बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे प्रशासनदेखील निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने बाजारपेठेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दलाल मंडळींचे यात चांगले फावले व त्याचा फायदा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न या मंडळींकडून सुरू झाला. त्याचाच प्रत्यय म्हणून धान्याचे भाव यंदा चांगलेत कडाडले.आवक असली तरी भाववाढमागणी वाढली तरी सुरुवातीला भाववाढ न झालेल्या गव्हाच्या भावात ३ एप्रिलपासून वाढ सुरू झाली. त्यानुसार या दिवशी गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली. त्यानंतर ही वाढ अशीच सुरू राहून दीड महिन्यांपूर्वी २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव सध्या २३५० ते २४५० रुपयांवर पोहचले आहे. लोकवन गव्हाचे भावदेखील २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटलवरून २२५० ते २३०० रुपयावर पोहचले आहे तर शरबती गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवरून २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर गेले आहे. चंदोसीचे भाव ३६०० ते ३७०० रुपयांवरून ३८०० ते४०००रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. विशेष म्हणजे आवक असली तरीही भाववाढ होत आहे.डाळींमध्ये अवाक् करणारी भाववाढआधीच उत्पादन कमी असल्याने भाववाढ होत जाणाºया डाळींच्या भाववाढीत भर घातली ती वायदे बाजाराने. बाजारातील मोठ्या उलाढालीने डाळींचे भाव तब्बल १२०० ते १३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. यामध्ये दीड महिन्यांपूर्वी ६८०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ सध्या ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ८०० ते १००० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ५२०० ते ५५०० रुपयांवरून ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. ५३०० ते ५६०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव सध्या ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ७३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटलवरून ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे.तांदुळाचेही भाव वाढलेहिवाळ््यापासून स्थिर असलेल्या तांदळाच्या भावातही या काळात वाढ सुरू होऊन तेदेखील २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढले. यात चिनोर ३३०० ते ३७०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४३०० ते ४६०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४९०० ते ५२०० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती तांदुळाचे भाव ९१०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचेले आहेत.खाद्य तेलाला महागाईची फोडणीगेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या खाद्य तेलालादेखील वायदे बाजारामुळे महागाईची फोडणी बसली आहे. या मध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच शेंगदाणा तेलाच्या भावात ६०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली असून ती अद्यापही कायम आहे.एक तर आवक कमी असल्याने धान्य, डाळींचे भाव वाढत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीमुळेही भर पडत आहे. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.शेंगदाणा तेलाचे भाव १२४ रुपये प्रती किलोवरून १३० रुपये प्रती किलो झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तेलाचे भाव स्थिर होते. मात्र या महिन्यात ते वाढले आहेत.- मनीष देपुरा, तेल विक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव