शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात खून झालेल्या तरुणावर पोलीस बंदोबस्तात आसोदा येथे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:15 IST

मू.जे.महाविद्यालयातील खून प्रकरण

जळगाव : मू.जे.महाविद्यालयात खून झालेल्या मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा. आसोदा) या विद्यार्थ्याचा मृतदेह रविवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात आसोदा येथे नेण्यात येऊन तेथे बंदोबस्तातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मू.जे.महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी आलेल्या मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा. आसोदा) या विद्यार्थ्याचा चॉपरने भोसकून खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये घडली होती. मोठ्या भावावर सपासपवार होत असल्याचा थरार लहान भाऊ रोहित याने आपल्या डोळ्यांनी पाहिला. हल्ला करणाऱ्याला रोहीतने पाठलाग करुन पकडले, मात्र त्याच्याही मानेवर एकाने चॉपर भिरकावला, पण सुदैवाने तो वार रोहीतने चुकविला. अन्यथा आणखी दुसरी मोठी घटना घडली असती.मुकेश हा वाणिज्य शाखेच्या तिसºया वर्षाची प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयात आला होता. लहान भाऊ सौरभ याचाही अकरावीत प्रवेश घ्यावयाचा होता.त्यामुळे मुकेश ही प्रक्रिया करीत असताना दुसरा भाऊ रोहित सेतू कक्षातून कागदपत्रे घेऊन महाविद्यालयात आला असता पार्कींगजवळ पुढे दुचाकीवर तिघं जण होते. त्यांनी अचानक ब्रेक दाबल्याने उतारमुळे त्यांची दुचाकी मागे आली. त्यामुळे रोहित याच्या दुचाकीला त्यांच्या दुचाकीचा धक्का लागला. त्यावरुन या तिघांनी रोहितशी वाद घालून तिघांनी त्याला अडवून मारहाण करायला सुरुवात केली.रोहित याच्याशी वाद झाल्यानंतर काही क्षणातच तेथे या तिघांच्या दिमतीला आणखी तिघं जण आले. या सहा जणांनी रोहित याला घेरले. त्याने हा प्रकार मोठा भाऊ मुकेश याला सांगितला. झेरॉक्स दुकानावर असलेला मुकेश धावतच आला असता या टोळक्याने दोघांना मारहाण केली. त्यातील लाल कपडे परिधान केलेल्या एका जणाने चॉपर काढून मुकेशच्या कपाळावर व छातीत चॉपरने हल्ला केला. या घटनेमुळे रक्तबंबाळ होऊन मुकेश जागेवरच कोसळ्ला. त्यामुळे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.इच्छारामने बोलावले इतरांनाइच्छाराम पुंडलिक वाघोदे (रा.समता नगर) हा मू. जे. महाविद्यालयात पदवीच्या कला शाखेच्या दुसºया वर्षाला आहे. तो देखील प्रवेशासाठीच आलेला होता. तेथे पार्कींगमध्ये त्याचा रोहीतशी वाद झाला. त्यामुळे इच्छाराम याने किरण अशोक हटकर (रा.नेहरु नगर), अरुण सोनार, व तुषार नारखेडे या तिघांना बोलावून घेतले. त्यातील एकाने मुकेशच्या पोटात, डोक्यात व छातीत चॉपरने हल्ला केला. हल्लेखोर महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत.

टॅग्स :Jalgaonजळगाव