वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : तालुक्यातील सार्वे प्र.लो. येथे अपघाती मृत्युमुखी पडलेल्या वानरावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.सार्वे प्र.लो.येथे झाडावर मस्ती करताना अचानक फांदी तुटून फांदीसह हे माकड खाली असलेल्या दगडावर पडले. दगडावर डोके आपटल्यामुळे या माकडाचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या वेळी मृत माकडाची अंत्ययात्रा काढून विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर ग्रामस्थांनी १० दिवस या माकडाचा दुखवटादेखील पाळला. दहाव्या दिवशी प्रतिष्ठित व्यक्तींसह ४० तरुणांनी तथा शालेय मुलांनी मुंडण केले. यात पोलीस पाटील रामकृष्ण पुनवते, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, श्रीराम पोसणे, ग्रामस्थ गोपाल तांदळे, सुभाष पोसणे, मोहन पोसणे, दीपक पुनवते, राजू मोगरे, भैया मोगरे, अनिल पोसणे, देवानंद पुनवते, हेमराज पाटील, तुळशीराम पोसणे आदींनी मुंडण केले. सुभाष पोसणे यांनी सर्व मुंडण केलेल्या ग्रामस्थ तरुण तथा शालेय मुलांना टोपीवर रुमाल दिले. तसेच यावेळी गावातून गोळा करण्यात आलेल्या रोख रकमेतून शिरा व भात ठेवण्यात आला होता. गावातील सर्व मंडळींनी या उत्तर कार्याच्या प्रसादाचा लाभ घेतला. कासमपुरा येथील पुरोहित ओंकार महाराज यांनी यावेळी विधिवत उत्तर कार्याची पूजा केली.
अपघाती मृत्युमुखी पडलेल्या वानरावर विधीवत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:53 IST
सार्वे प्र.लो. येथे अपघाती मृत्युमुखी पडलेल्या वानरावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघाती मृत्युमुखी पडलेल्या वानरावर विधीवत अंत्यसंस्कार
ठळक मुद्देदहा दिवस पाळले सुतक४० ग्रामस्थांनी केले मुंडण