शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबादला विवाहितेचे अंत्यसंस्कार रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 12:58 IST

संशयास्पद मृत्यू : आरोप-प्रत्यारोपात डॉक्टरांचा शवविच्छेदन करण्यास नकार

ठळक मुद्देह्दयविकाराचा झटका डॉक्टरांचा शवविच्छेदनास नकारपतीचे दुसरे लगA

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 - तालुक्यातील ममुराबाद येथे पूजा भगवान लोहार-पवार (वय 21) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या कारणावरुन अंत्यसंस्कार रोखण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, माहेरच्या लोकांनी केलेल्या आरोपामुळे पोलिसांनी                 पती, सासू, सासरा व दिर अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. आरोप,प्रत्यारोपामुळे जिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. शेवटी पूजा यांच्या आई, वडीलांची लेखी घेतल्यानंतर रात्री उशिरा शवविच्छेदन झाले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पूजा लोहार या विवाहितेला शनिवारी मध्यरात्री दीड वाजता छातीत दुखत असल्याने ह्दयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावला दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु तरीही तिला खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर पहाटे तीन वाजता मृतदेह ममुराबादला नेण्यात आला. पूजा यांचा मृत्यू झाल्याने तीन वाजता माहेरी घटना कळविण्यात आली.इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचा आग्रह  शवविच्छेदन गृहात आलेल्या डॉक्टरांना पूजाच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचा आग्रह केला, मात्र जळगावला तशी सुविधा नाही, त्यासाठी तुम्हाला धुळे येथे मृतदेह न्यावा लागेल असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर नातेवाईकांनी तोच मुद्दा लावून धरत धुळ्याचा आग्रह केला. धुळे येथे गेल्यावर अंत्यसंस्कारासाठी होणारा विलंब व अहवालही उशिरा मिळणार असल्याबाबत जाणीव करुन दिल्यानंतर माहेरची मंडळी जळगावात शवविच्छेदनास तयार झाली. डॉक्टरांनी येथे शवविच्छेदन करण्यास सपशेल नकार दिला. पोलिसांनी विनंती करुनही डॉक्टर तयार होत नव्हते. आई, वडीलांची लेखी घेतल्यानंतरही डॉक्टर आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे व नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर रात्री आठ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पती भगवान, सासरे श्रावण मैफत लोहार, सासू यशोदा व दीर रामदास यांना अंत्यसंस्कारासाठी पोलीस वाहनातून ममुराबादला नेण्यात आले. पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. पती भगवान श्रावण लोहार याचे पूजाशी दुसरे लगA झाले होते. याआधीच्या प}ीला त्याने घटस्फोट दिला आहे. दरम्यान, दोन वर्षापूर्वीच पूजाशी त्याचा विवाह झाला होता. दोघांना 9 महिन्याचा मुलगा आहे. तर पूजा ही दोन भावांची एकुलती एक बहिण होती. पूजाचे माहेर दादली, ता.सिन्नर, जि.नाशिक येथील आहे. एक भाऊ निलेश आठवीला तर दुसरा राहूल नववीला शिक्षण घेत आहे. भगवान याचे ममुराबाद वेल्डींगचे दुकान आहे.पूजा हिच्या सासरच्या लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिच्या साडीवर असलेले डाग हे मासिक पाळीचे होते तर ह्दयविकाराचा झटका आल्यामुळे दवाखान्यात नेण्याच्या गडबडीत कानातील बाही ताणली गेली त्यामुळे तेथे रक्त आले. कानातून रक्त आलेले नाही. या डागा मुळेच मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला. असे असले तरी शवविच्छेदन अहवालातच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.