शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

भारतीय जैन संघटनेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचते- अरुणभाई गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:14 IST

----- चोपडा : सर्वसामान्यांसाठी अनेक योजना शासनातर्फे राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थादेखील तळागाळातील जनतेला मदत करण्यासाठी पुढे येतात. ...

-----चोपडा : सर्वसामान्यांसाठी अनेक योजना शासनातर्फे राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थादेखील तळागाळातील जनतेला मदत करण्यासाठी पुढे येतात. विविध शासकीय योजना, मदत सर्वसामान्यांपर्र्यंत पोहचतेच असे नाही. मात्र, भारतीय जैन संघटनेचे कोणतेही कार्य असले तरी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचते. हे संघटनेच्या कार्यकर्र्त्यांंच्या मेहनतीचे फळ आहे. भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते सर्वसामान्य परिस्थितीतून आलेले असल्याने त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचते, असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी काढले.भारतीय जैन संघटनेकडून सोशल मीडियावर आवाहन केल्यानुसार लोकसहभागातून गरीब, आदिवासी, मागासवर्गीय होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम २८ जून रोजी महिला मंडळ शाळेच्या हॉलमध्ये आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर चोपडा पीपल्स बँकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, पंचायत समितीचे गटसमन्वयक तथा ग.स.संचालक देवेंद्र पाटील, चोपडा-निमगव्हाण गटातील केंद्रप्रमुख युवराज पाटील, प्रा.गोविंद गुजराथी, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष क्षितिज चोरडिया, महिला मंडळ शाळांचे प्राचार्य सुनील चौधरी आदी उपस्थित होते.सरस्वतीमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत संघटनेच्या सभासदांकडून करण्यात आले. यावेळी गट समन्वयक देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारतीय जैन संघटनेचे कार्य लोकाभिमुख आहे. मूल्यवर्धन करणारी शिक्षणपद्धती, नाला खोलीकरण, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना मोफत शिक्षण, बिझनेस डेव्हलपमेंट, महिला सक्षमीकरण असे अनेक उपक्रम संघटनेकडून राष्ट्रीय स्थरावर राबविले जातात. स्थानिक पातळीवर आरोग्य शिबिरे, अनाथ मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसारखे विविध उपक्रम सुरूच असतात. त्यांचे हे कार्य तळागाळातील जनतेसाठी असते, असे बोलून त्यांनी संघटनेचे कौतुक केले.या शाळांना वह्या वाटप---मॉडर्न गर्ल स्कूल, सद्गुरू कन्या विद्यालय, पालिका हायस्कूल, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, महिला मंडळ विद्यालय, जिल्हा परिषद शाळा क्रमांक- १, २, व ३, मुस्तफा अँग्लो उर्र्दू स्कूल, प्रताप विद्यामंदिर नागलवाडी, कमला नेहरु वसतिगृह, सावता माळी वसतिगृह, महात्मा गांधी विद्यालय, सत्रासेन आश्रमशाळा, उमर्र्टी आश्रमशाळा, बोरअजटी आश्रमशाळा, जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी, जि.प.शाळा विषणापूर, जि.प.शाळा जिरायतपाडा, जि.प.शाळा कारखाना, सातपुडा आदिवासी जनता वसतिगृह, जि.प.कन्या विद्यालय आदी शाळांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.या दात्यांकडून मदत-सुभाषचंद्र बरडिया, सुगनचंद बोरा, रमेश राखेचा, डॉ.तेजपाल चोरडिया, नरेश लोडाया, उमेदमल टाटिया, अ‍ॅड.अशोक जाधव, जीवनलाल ब्रह्मचा, दिलीप बरडिया, पारस आॅटो सेंटर, वामनराव फ्रूट सेल सोसायटी, नंदकिशोर देशमुख, रमेशभाई नागदेव, करसनदास नानाजीभाई मिठाईवाले, बाबूलाल बोथरा, दिनेश बरडिया, नवल भिकमचंदजी बरडिया, राजेंद्र मेहेर अडावद, ललित टाटिया, सुरेशचंद दर्डा, प्रा.गौतम छाजेड, सुनील प्रेमचंदजी बरडिया, शोभा चोपडा, गौतम सांड, विनोद पालीवाल, अनिल बुरड, संजीव बाविस्कर, प्रकाशचंद सुराणा, सुगनचंद सांड, चंद्रकांत जैन, अमृत आप्पा वाघ, ए.डी.चौधरी, डॉ.आर.टी. जैन, हेमंत छाजेड, धीरेंद्र जैन, नमन मोबाईल, निखिल भदाणे (पुणे), सुरेश राखेचा, अनुप जैन आदींनी मदत केली. त्यांचे सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.कार्यक्रम यशस्वितेसाठी संघटनेचे सचिव दिनेश लोडाया, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल कोचर, तालुका उपाध्यक्ष विपुल छाजेड, कोषाध्यक्ष निर्मल बोरा, जितेंद्र बोथरा, दीपक राखेचा, आनंद आचलिया, आदेश बरडिया, अभय ब्रह्मचा, आकाश सांड आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय बारी तर आभार प्रदर्शन लतीश जैन यांनी केले.