शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सपनाच्या शिक्षण पूर्ण करण्याच्या स्वप्नाला हातगाडीवर व्यवसाय करणाºया विनोदची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 18:58 IST

धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील गृहिणीने लग्नानंतर शिक्षण पूर्ण करीत नेट परीक्षेत मिळविले यश

ठळक मुद्देपती विनोद पाटील यांचा जळगावातील बहिणाबाई चौकात हातगाडीचा व्यवसायपतीसह सासरच्या मंडळींनी दिली अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी.रिक्षा चालक वडील व पतीच्या प्रोत्साहनामुळे सपनाच्या स्वप्नांना पाठबळ

आॅनलाईन लोकमतधरणगाव, दि. ६ : रिक्षा चालक वडिल आणि हातगाडीवर व्यवसाय करणाºया पतीच्या प्रोत्साहनाच्या बळावर धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील गृहिणी सपना पाटील यांनी नेटची परीक्षा पूर्ण करीत आपल्या स्वप्नपूर्तीचे पहिला टप्पा पूर्ण केला आहे.अमळनेर तालुक्यातील चांदणी कुºहे येथील माहेरवाशिण असलेल्या सपना हिचे लग्न सात वर्षांपूर्र्वी कल्याणे खुर्द ता.धरणगाव येथील विनोद बाळूू पाटील या युवकाशी झाला. वडिल सुरत येथे रिक्षा चालक असल्याने परिस्थिती नुसार त्यांनी सपना यांना १२ वी पर्यत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सपनाचे शिक्षित- होतकरु असलेल्या युवकाशी लग्न लावून दिले. विनोदनेही संसाराचा गाडा ओढण्यासाठी नोकरीच्या मागे न धावता जळगाव येथील बहिणाबाई चौकात अंडा-पावची हातगाडा सुरु केली. सपनाने पती विनोद, सासरे बाळू पाटील, सासू जनाबाई यांना अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करू देण्याची विनंती केली. सर्व परिवाराने प्रोत्साहन देत १२ वी नंतरचे शिक्षण माम सासरे डी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरु करण्यास सहमती दर्शविली. सपनाने बी.ए.,एम.ए.,एम.एड् चे शिक्षण पूर्ण करुन नेट ची तयारी सुरु केली. अभ्यास सुरु ठेवत नेट हिंदी विषयात त्या नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशामुळे शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता सपना यांनी पी.एच.डी. करण्याची जिद्द ठेवली आहे. एका हातगाडीवर व्यवसाय करणाºया युवकाने पत्नीला शिक्षणासाठी दिलेले पाठबळ अनेकासांठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगाव