शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या डॉक्टर्सची पूर्ण वेळ सेवा सुरु - आयएमए अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:42 IST

चार डॉक्टर कार्यरत

आनंद सुरवाडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला. मात्र, त्यासाठी आयएमएने स्वत: पुढाकार घेऊन २५० डॉक्टरांची शासकीय पातळीवर सेवा देण्यासाठी नियुक्ती केली आहे़ एवढेच नव्हे तर अधिग्रहीत रुग्णालयातही तज्ज्ञ डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील यांनी दिली़ जळगावच्या कोविड रुग्णालयात आयएमएच्या डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतह्णलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध बाबी उलगडून सांगितल्या.प्रश्न : कोविड रुग्णालयात आयएमएचे नेमेक किती डॉक्टर्स व किती वेळ सेवा देत आहे?डॉ़ पाटील : कोविड रुग्णालयात मनुष्यबळाची खरच कमतरता आहे़ हा मुद्दा ओळखून जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आयएमएच्या २५० डॉक्टरांची कोविड रुग्णालयात सेवा लावण्यात आली आहे़ यात सकाळी दोन डॉक्टर्स तीन तास व सायंकाळी दोन डॉक्टर्स चार तास असे चार डॉक्टर दिवसातून सहा तास या रुग्णालयात सेवा देत आहे़प्रश्न : डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत नसल्याचा आरोप आहे़डॉ़ पाटील : तसे नाही, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार तीन तास सेवा देणे पुरेसे आहे़ त्यादृष्टीने ही या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिवाय अधिग्रहीत रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्ण वेळा सेवा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही़प्रश्न : अमळनेर पॅटर्न जळगावात का राबविला जात नाही?डॉ़ पाटील : अमळनेर हे त्यामानाने छोटे शहर आहे़ त्या ठिकाणी डॉ़ अरविंद शिंदे यांनी कोविडसाठी रुग्णालय खुले करून दिले होते़ जळगावात अधिग्रहीत रुग्णालयात शुक्रवार ५ जूनपासून खासगी डॉक्टर्स पूर्ण वेळ सेवा देत आहेत. त्यामुळे अमळनेर पॅटर्न असा वेगळा राबविण्याची गरज नाही़डेथ आॅडिट कमिटीचे उद्दीष्ट काय?काही बाबींची अपूर्णत: असणे, मनुष्यबळाचा अभाव यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचे चित्र आहेच़ या बाधितांच्या मृत्यूमध्ये नेमके चुकले कुठे काहींचे प्राण वाचविता आले असते का? कुठे काही हलगर्जीपणा झालेला आहे का? याची माहिती घेतली जाणार आहे.जळगावला मेडिकलची पंढरी म्हटले जाते तरी रुग्ण संख्या का वाढली ?नागरिक मास्कचा वापर नीट करीत नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. बाजार समिती, भाजीबाजार आदी ठिकाणी गर्दीवर नियंत्रण नाही, त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे़ शिवाय लोक दवाखान्यात यायला घाबरत आहेत. समोर यायला घाबरत असल्याने आजार लपविला जात आहे. यातूनही संसर्गाचा धोका अधिक आहे़ त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे़बाधितांच्या मृत्यूचा अभ्यास केल्यास अनेक लोक थेट मृतावस्थेतच रुग्णालयात आले़ अनेकांचा मृत्यू ४ ते ६ तासाच्या आत झाला़ ज्यांना अन्य व्याधी आहेत, त्यांचे प्रमाण अधिक आहे़ - डॉ़ दीपक पाटील, अध्यक्ष, आयएमए जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव