शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बोदवड येथे पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:24 IST

बोदवड येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असून, यासाठी मंगळवारी दुपारी पाणी समितीतर्फे नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नगराध्यक्षा दालनात नसल्याने आंदोलकांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात नेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देपाणी समितीचा तीन तास नगराध्यक्ष दालनात ठिय्या२२ आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई जिल्हाधिकाऱ्यांची मनधरणी निष्फळ

बोदवड, जि.जळगाव : बोदवड येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असून, यासाठी मंगळवारी दुपारी पाणी समितीतर्फे नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नगराध्यक्षा दालनात नसल्याने आंदोलकांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात नेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.बोदवड शहराला गत २० दिवसांपासून न झालेल्या पाणीपुरवठ्याच्या तसेच ओडीएच्या थकीत वीज बिलापोटी बंद पडलेला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी येथीला पाणी समितीने मोर्चा काढला.गत २० दिवस उलटूनही पिण्याचे पाणी देण्यास असमर्थ ठरलेल्या बोदवड नगर पंचायतीला बरखास्त करावी. तसेच नगरसेवक, नगराध्यक्षा व आमदार, खासदार यांनी आपले राजीनामे द्यावे या मागणीसह दुपारी एक वाजता शहरातील गांधी चौकात पाणी समितीचे संयोजक अमोल देशमुख, संगीता पाटील, शीतल पाटील, सुमंगला तळेगावकर, शोभा माटे, अर्चना देशमुख, शोभा प्रजापती, धनराज सुतार, संदीप बडगुजर, प्रशांत बडगुजर, उमा देशमुख, उमेश गुरव, संजय बोदडे, सुनील जैस्वाल, अजय जैस्वाल, रुपेश अग्रवाल, निखिल अग्रवाल, नारायण चोपडे, सुनील सपकाळ, अनुष्का पाटील, कृष्णा जाधव, रवीन चोरडिया यांच्यासह नागरिकांनी सभा घेत नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.सदर मोर्चातील नागरिक घोषणा देत नगर पंचायत कार्यालयावर गेल्यानंतर आंदोलकांनी मुख्य अधिकाºयांना निवेदन दिले. त्यानंतर नगराध्यक्षा मुमताजबी बागवान यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बोलविले. मात्र त्या हजर नसल्याचे सांगण्यात आले. सदर पाणी प्रश्न असताना नगराध्यक्षा उपस्थित नसल्याने पाणी समितीच्या सदस्यांनी नगराध्यक्षांच्या दालनात त्या येत नाही तोपर्यंत ठिय्या मांडला.नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी संपर्क केला असता त्या जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे सांगितले. नंतर त्यांच्या पतीने लग्नासाठी बाहेरगावी गेल्याचे कारण सांगितले. यामुळे समितीच्या सदस्यांना बनवाबनवी असल्याचे वाटल्याने त्यांनी थेट नगराध्यक्षांंच्या दालनात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यावेळेस मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला तीन मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उठणार नसल्याचे सांगत ठिय्या कायम ठेवला.जिल्हाधिकाºयांची मनधरणी निष्फळशेवटी पर्याय म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले व शहरातील पदाधिकारी व १७ नगरसेवकांपैकी उपस्थित दोन नगरसेवकांंनी मध्यस्थी केली व जिल्हाधिकाºयांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी ठिय्या मोडा, वीज बिल भरले जाईल, ओडीए सुरू होणार असल्याचे सांगितले, परंतु आंदोलकांनी लेखी तसेच कायम आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा व थकीत वीज बिलामुळे ओडीए बंद पडणार नसल्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उठणार नसल्याने मध्यस्थी निष्फळ ठरली.नगरपंचायतीला पोलीस छावणीचे स्वरूपशेवटी कार्यालयीन वेळ संपत आल्याने व नगर पंचायतीला पोलीस छावणीचे स्वरूप आले. यामुळे प्रशासन हतबल झाले आणि मुख्याधिकाºयांनी पोलिसांना नगरपंचायत कार्यालयात अनधिकृतपणे सुरू असलेल्या ठिय्या उठविण्यासाठी पत्र दिले. पोलिसांनी आंदोलकांना कलम ६८ प्रमाणे ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात नेऊन नंतर कलम ६९ प्रमाणे सोडून दिले.याबाबत बोदवड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता प्रशासनाच्या वतीने मी निवेदन स्वीकारले आहे. पाणी पुरवण्यासाठी शहराची पाणी व्यवस्था जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर आधारलेली आहे. शहराची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे मी लेखी देऊ शकत नाही, असे सांगितले.पाणी समितीचे संयोजक अमोल देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता, ‘पाण्याचा नैतिक हक्क जर मिळत नसेल तर नगरसेवकांनी जबाबदारी स्वीकारुन राजीनामे द्यावे. आमदार, खासदार तसेच मुख्याधिकाºयांसारखे अधिकारी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करतात, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, आम्ही पाणी प्रश्नासाठी जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचे संगितले.नगरसेवकांची नैतिकता संपलीपाण्यासारख्या प्रश्नावर जनता आंदोलन करीत असताना नगरसेवक मात्र ठेकेदारीचे दुकान मांडून गप्प बसल्याने शहरवासीयांचा संयम सुटला व त्यांनी थेट ठेकेदारीचे दुकान कसे सुरू आहे, याचे उदाहरण देत त्यांच्या नैतिकतेला काढले तर या विषयावरून नगरसेवक व पाणी समितीत वादही झाला. शेवटी या विषयावर पडदा पडला.मोर्चेकºयांना कोणतेही ठोस लेखी आश्वासन न मिळता ठिय्या मोडावा लागला. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड