अमळनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले.अवकाळी पावसाने तालुक्यातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी व विम्याची रक्कम त्वरित अदा करावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी दौलत पाटील, नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली एच.टी.माळी, दिलीप पाटील, उमाकांत पाटील, भानुदास पाटील, मधुकर पाटील, संतोष पाटील, नाना चौधरी, भिका महाजन, धोंडू पाटील, समाधान पाटील, शिवाजी पाटील, मळाराम माळवे, दिलीप पाटील, विश्वास पाटील, पांडुरंग चौधरी, बाळू पाटील, बाबूलाल पाटील, योगेश पाटील, जीवन पाटील आदी कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:25 IST