शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तहसील कार्यालयासमोर ‘जनसंग्राम’ चे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:40 IST

सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.

ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन आपद्ग्रस्त केळी उत्पादकांना दिलेली मदत तुटपूंजीसरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका

रावेर, जि. जळगाव : कर्जमाफीची घोषणा करूनही ती मिळाली नाही, अब्जावधी रूपयांची केळी जमीनदोस्त होवून अजूनही दमडी शेतकºयांच्या पदरात पडली नाही, कापसावर नवीन बोंडअळी पडली तरी गतवर्षाचे बोंडअळीच्या नुकसानीचे अर्थसाहाय्य अजून पदरात पडले नाही. हंगामावर हंगाम तोट्यात जात असतांना सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रावेर तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या सुमारास एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली.दरम्यान, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हितासंबंधी नाकर्तेपणावर खरपूस टिका केली. जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी शेतकºयांच्या नुकसानासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याची टीका करत गत चार वर्षांपासून होत नसलेली आमसभा घेण्याची मागणी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, युवक रा. काँ तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, रावेर तालुका अ‍ॅग्रो डिलर्सचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, जिजाबराव पाटील, महेश लोखंडे, राजेंद्र चौधरी, विलास ताठे, शालीग्राम पाटील, प्रमोद कोंडे, हृदयेश पाटील, शेख महेमुद शेख हसन, शिवाजी पाटील, भागवत महाजन, विजय पुराणे, किरण चौधरी, इसाक पटेल, धिरज चौधरी, मुज्जफर पटेल, शेख मंजूर शेख कादर, मधुकर पाटील, सुरेश शिंदे, अरविंद गांधी, लक्ष्मण मोपारी, काशीनाथ रायमळे, युसूफ खान इब्राहिम खान, शेख गयास, शेख कालू, डी.डी.वाणी, अशोक गढे, पुंडलिक पाटील, भागवत चौधरी, यशवंत महाजन, शिवाजी पाटील आदी यावेळी सहभागी झाले होते. दरम्यान, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले. 

टॅग्स :agitationआंदोलन