शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:53 IST

पहूर ता. जामनेर : पहूर पेठ, कसबे येथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ घातली असून यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना निवेदन दिली आहेत. तथापि तालुका प्रशासन निद्रीस्त अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगोगडी धरणात अत्यल्प साठा शिल्लककमी पावसामुळे यंदा आॅक्टोबरपासूनच संकट

पहूर ता. जामनेर : पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही. व परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील धरणे भरली नाहीत. काही धरणांमध्ये अल्प पाणीसाठे शिल्लक आहेत. पण या पाण्याचा उपसा होत असल्याने काही दिवसातच पहूरकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची स्थिती येऊन ठेपणार आहे. आरक्षित ठेवलेल्या पाण्यासाठी पेठ व कसबे ग्रामपंचायतीने तातडीने कठोर भूमिका घेऊन कृषीपंप उचलण्यासाठी तहसीलदारांसह सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा ग्रामपंचायत पेठच्या माध्यमातून केला जातो. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही.तुरळक झालेल्या पावसाने वाघूर नदीला आलेल्या पाण्यामुळे मोतीआई धरणात अल्पसा पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा गावाच्या पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. तर गोगडी धरणातून कसबे गावाला पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाणी साठा संपुष्टात आला असून मृत साठ्यातून पाणी पुरवठा करतांना कसबे ग्रामपंचायतची दमछाक होत आहे. आरक्षित केलेल्या पाणी साठ्यातून कृषीपंपाव्दारे उपसा केला जात असल्याने येत्या काही दिवसातच पहूरकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे.दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास पंचवीस ते तीस हजार असून दोन्ही ग्रामपंचायतीसमोर पाण्याचा भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. हा प्रश्न दरवर्षी मार्च, एप्रिल नंतर निर्माण होत असे यंदा मात्र आॅक्टोबर महिन्यापासूनच ही पाणी टंचाईची परिस्थिती पहावयास मिळत आहे.पहूर परिसरात दुष्काळसदृष्य स्थितीपुरेसा पाऊस न झाल्यामूळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. बरड जमीनीवरील कपाशी, मका, ज्वारी पिके करपून गेली आहेत. परीसरात उपलब्ध असलेले पाणी देऊन शेतकरी आहे ते कपाशी पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्वाचा बनला आहे. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले कृषी उत्पन्न मातीमोल झाल्याने दुष्काळाच्या झळा अधिकच जाणवू लागल्या आहेत.मोतीआई धरणात आरक्षित ठेवण्यात आलेल्या पाणी साठ्यातून गावाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. या पाण्याचा उपसा करणाºया कृषीपंपाना उचलण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृषीपंप उचलण्याची गावात दवंडी फिरविण्यात आली असून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.- नीता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूर पेठगोगडी धरणात मृत साठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा असून कृषीपंप उचलण्यासाठी एक महिन्यात दोन वेळा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन उडवाउडवीचे उत्तरे देत असून कारवाई करण्यासाठी पाऊले उचलत नाही. काही दिवसातच पाणी समस्या गंभीर होणार आहे.-ज्योती शंकर घोंगडे, सरंपच कसबे 

टॅग्स :Waterपाणी