शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

मुक्ताईनगर, जि. जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर येथील पाहणी दौऱ्यात एका तरुण शेतकऱ्याने ताफ्यातील ...

मुक्ताईनगर, जि. जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर येथील पाहणी दौऱ्यात एका तरुण शेतकऱ्याने ताफ्यातील वाहने अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथे मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची फडणवीस यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार घडला. मंगळवारी दुपारी फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा या शेतकऱ्याच्या शेताकडून जात होता. त्याचवेळी योगेश याने ताफा अडवून फडणवीस यांना आपल्या शेतात येऊन पाहणी करावी, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी टाळल्याने आपला दौरा फोटो सेशनसाठी असल्याचा आरोप त्याने केला. यावेळी योगेश याने सोबत विषाचा डबा आणला होता. तो पोलिसांनी जप्त केला. यानंतर फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.

चौकट

फडणवीस खडसेंच्या कोथळीत, तर खडसे मुंबईत

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला गतिरोधक ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन येथे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. तिकडे खडसे मात्र सोमवारी मुंबई येथे पोहोचले आहेत. मंगळवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले. त्यांच्यासोबत गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते. सुमारे २० मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात थांबले होते. फडणवीस खडसे यांच्या निवासस्थानी, या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी चहापानाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आपण तिथे गेलो होतो. यात इतर कुठलेही कारण नव्हते. असे फडणवीस यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांनी फडणवीस यांचा ताफा अडवत केळी पीक विम्याबाबत केंद्राच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करीत पूर्वीची योजनाच अंमलात आणावी, अशी मागणी केली.

चौकट

भाजप पदाधिकारी अनुपस्थित

फडणवीस यांच्या दौऱ्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक पदाधिकारी अनुपस्थित होते. मुक्ताईनगर नगर पंचायतीचे आठपैकी केवळ नगराध्यक्ष नजमा तडवी आणि ललित महाजनवगळता एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना

सरसकट भरपाई द्या

वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ही बाब लक्षात घेता सरकारने पंचनामे न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी रावेर येथे पत्रकार परिषदेत केली.

पीक विम्यासंदर्भात राज्य सरकारने मागील हंगामात टेंडरच न काढल्याने स्वतःच्या चुका व नाकर्तेपणा लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार खोटारडेपणा करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकार निकष ठरवते व केंद्र पैसा देते. मात्र, राज्य सरकार स्वतःची चूक लपवत असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस यांनी जामनेरला घेतला राजकीय स्थितीचा आढावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी आमदारांनी मंगळवारी सकाळी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा फडणवीस यांनी आढावा घेतला. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास फडणवीस यांचे जामनेरला आगमन झाले. नगराध्यक्ष साधना महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.