शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

स्वातंत्र्य हे मोफत नव्हे तर नियंत्रण रेषेवरचा सैनिक त्याची किंमत मोजत असल्याची जबाबदारी बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:18 IST

अधिकार व जबाबदारीला आम्ही स्वातंत्र्य समजून स्वातंत्र्याची किंमत मोजत नसल्याची शोकांतिका आहे. बेभानपणे, बेजबाबदारपणे उन्मत्त व उन्मादाने तथा भ्रष्टाचाराने आपण वागत असल्याचे मोठे दुर्दैव आहे म्हणून स्वातंत्र्य हे मोफत नसून त्याची जबाबदारी आपण स्वीकारून जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्याची जात, पात, धर्म, पंथ, भाषा, रक्त हे सर्वस्वाचे आपले राष्ट्र असल्याचा जोश, दृढभावना व आत्मबळ असलेला नियंत्रण रेषेवरील सैनिक चुकवत असल्याची जाणीव ठेवून देशातील विघातक शक्तींना हाणून पाडण्याची गरज पुणे येथील लक्ष्य फाऊंडेशनच्या व्याख्यात्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरावेर येथे रंगपंचमी व्याख्यानमालेत अनुराधा प्रभुदेसाई यांनी दिला तरूणाईला कानमंत्र‘ऋणानुबंध सैनिकांशी - कारगील शौर्यगाथा’ या विषयावर गुंफले दुसरे पुष्प

रावेर, जि.जळगाव : अधिकार व जबाबदारीला आम्ही स्वातंत्र्य समजून स्वातंत्र्याची किंमत मोजत नसल्याची शोकांतिका आहे. बेभानपणे, बेजबाबदारपणे उन्मत्त व उन्मादाने तथा भ्रष्टाचाराने आपण वागत असल्याचे मोठे दुर्दैव आहे म्हणून स्वातंत्र्य हे मोफत नसून त्याची जबाबदारी आपण स्वीकारून जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्याची जात, पात, धर्म, पंथ, भाषा, रक्त हे सर्वस्वाचे आपले राष्ट्र असल्याचा जोश, दृढभावना व आत्मबळ असलेला नियंत्रण रेषेवरील सैनिक चुकवत असल्याची जाणीव ठेवून देशातील विघातक शक्तींना हाणून पाडण्याची गरज पुणे येथील लक्ष्य फाऊंडेशनच्या व्याख्यात्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूलच्या रंगमंचावर आयोजित रंगपंचमी व्याख्यानमालेत ‘ऋणानुबंध सैनिकांशी - कारगील शौर्यगाथा’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. भवरलाल अ‍ॅड.कांताई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशनने हे व्याख्यान प्रायोजित केले होते.प्रारंभी पुण्याच्या व्याख्यात्या प्रभुदेसाई, चेअरमन प्रा.प्रकाश मुजूमदार, माजी सैनिक पांडूरंग माळी, पिंटू महाजन, हेमेंद्र नगरीया, प्रतीक महाजन यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. संयोजकांतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक विश्र्वस्त दिलीप वैद्य यांनी केले.व्याख्यानाचे पुष्प गुंफताना त्या म्हणाल्या, लक्ष्य फाऊंडेशनने देश हा धर्म आणि सैनिक हीच जात मानून ४ आॅक्टोबर २००४ रोजी स्थापन सैनिकांसोबत दिवाळी, सैनिकांसोबत व्हॅलेंटाईन डे, सैनिकांविषयी जनजागृती करण्यासाठी पुस्तकांचे प्रकाशन व शाळा महाविद्यालयतून जनजागृती करून जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवण्याचे कार्य करीत असल्याची ओळख करून दिली. त्यांनी सैनिक अनुभवला, दिसला व भावल्याचे स्पष्ट करून त्यांच्या डोळ्यात अंगार आणि प्रेम पाहील्याची अनुभूती विषद केली. त्यांचे प्रेम प्रखर राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रभक्तीत पाहील्याचे स्पष्ट केले. कारगील युध्दात शत्रु उंचावरून तोफांमधून व हवेतून शस्त्रांचा हल्ला करीत असताना आम्ही पर्वतावर चढत राहीलो. भारतीय सैनिकांचे रक्त सांडले पण अन् थिजले पण, तरीही मागे खचून परतलो नाही. कारण आमच्यातील राष्ट्राभिमान हीच खरी ताकद असल्याचा गौरव त्यांनी केला.आयुष्यात आपण हसत घेतले तर कोणते ही ध्येय गाठणे अशक्य नसल्याचे सांगत, सीमेवरचा जवान जोश होगा तो होश होगा और सांस होगी तो आस होंगी. अशी दुर्दम्य इच्छाशक्ती प्रकट करीत असल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. सफोरहून कंदहारकडे जातांना पूर्वीच्या भेटीतला जवान ओंकार हा जेंव्हा मला ‘साखरेचे पोते... वीस रुपये किलो..’ या आनंदाची गोडी सांगणारे ब्रीदवाक्य बोलून गेला तेंव्हा त्याने तो आता लेफ्टनंट कर्नल ओंकार असल्याची ओळख देत, मी आता मावशी तुलाच नाही तर माझा सारा देश खांद्यावर घेतोय.. असे जबाबदारीने व आत्माभिमानाने बोलला तेंव्हा खरोखर मन गहिवरून आले. रस्त्यात दहशतवाद्यांचा हल्ला २० मिनिटे सुरू होता. जन्म मृत्यूची टांगती तलवार होती. नागरिकांवर हल्ला चढवून जवानांना विचलीत करण्याचा प्रयत्न पाकिस्तानींकडून सुरू होते. तेव्हा माज्या पावलावर पाऊल ठेवून या, असे सांगून कव्हर करणारा सैनिक मला परमेश्वरच वाटत असल्याचा आत्मानुभव त्यांनी कथन केला.लडाखमध्ये रस्ते मरो या मारो असे रस्ते. तुर्तूक, झिंग्राल या पोस्ट १९६२ मध्ये आपल्या १०० सैनिकांविरूद्ध चिनी १००० सैनिकांनी युध्द पुकारून आपले राष्ट्रीय ध्वज व सैनिकांचे मृतदेह पँगाँगच्या बर्फाळ किनारा भारतीय सैनिकांच्या रक्ताने माखून लाल झाला होता. मात्र तोच किनारा थ्री इडियट्स चित्रपटात प्रदर्शित करण्यात आल्याने आता करीना पॉईंट म्हणून ओळखला जातोयं. एवढे साधे हौतात्म्य नव्हते त्या आमच्या अनाम वीरांचे. म्हणून त्या वीरांच्या हौतात्म्यासाठी आपल्या मनात तरी घर उभे राहावे अशी सादही त्यांनी श्रोत्यांच्या मनात घातली.सीमा नियंत्रण रेषेवर पीओके जवळ रूस्तम पोस्ट होती. - ५६ ते ५६ डिग्री सेल्सिअस मध्ये काम करतात. फजल, पुंछ, रजौरी अख्नूर, बहादूर पोस्टला भेटी देऊन जवानांशी ऋणानुबंध जोपासल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरखा जवान आजारी असल्याने ७२ तास हजर होता. पाच मिनीटे झोप चाटून गेली असता पाकिस्तानी सैनिकाने त्याची रायफल पळवली.जागी होताच त्याने पाकिस्तानी सैनिकाचे काजवे चमकवून बंदूक परत आणली. तेव्हापासून त्या चौकीला बहादूर चौकी तर पाकिस्तानी चौकीला उल्लू चौकी म्हणून ओळखले जाते.चीन सीमेवर ना बंदूक चाहिये ना तलवार चाहिये, गढवाली के खून मे उबाल चाहीए... अशा अरुणाचल- नागालँड तथा सीयाचीन ग्लॅशियर या चीन सीमारेषावर ३०० किमी वारे, - ५६ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत ऋतु बदललेले तरी कर्तव्य एकच असल्याने आमचा जवान नियंत्रण रेषेशी प्रणय करीत असल्याचे आत्मसमर्पण त्यांनी व्यक्त केले.भारतीय वायुसेना व पायदळाचे बळावर कारगील युध्द लढले गेले. असंख्य पायदळ जवान प्रतिकूल परिस्थितीत मारले गेले. १८ हजार फूट उंचावरून शत्रूला नमवणे. ४०० पेक्षा जास्त सैनिक शहीद व असंख्य जायबंदी झाले होते. ओठात विजयाचे गाणं होतं आणि पायात देशाची शान होती. कॅप्टन मनोज कुमार पांडे चौथे बंकर उद्ध्वस्त करून शहीद झाले. कॅप्टन विक्रम बात्रा यांनी मस्कूल नाला चौकीवर पॉईंट ४८७५वर तिरंगा फडकावला पण जल्लोषात विक्रम बात्रा नव्हते. त्यांच्या नावाने तो पॉईंट आजही ओळखला जातो. टायगर हिल जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. टायगर हिल सर करण्यापुर्वी तो जिंकण्यासाठी १६० रॉकेट्सचा हल्ला हिलटॉपवर स्वत:च्या दिशेने चढविण्याचे फर्मान काढून स्वत: चा जीव धोक्यात घालून टायगर हिल पाकिस्तानी सैन्याला नमवून जिंकल्यांचा भारतीय सेनेचा गौरव त्यांनी व्यक्त केला.आपली प्रसारमाध्यमे देशातील राजकारण, पाश्चात्य खेळ व मनोरंजनापलीकडे जवान व किसान यांचा गौरव करण्यात मागे असल्याची खंत व्यक्त करून आजच्या तरुणाईला जाज्वल्य इतिहासाची ओळख होवू शकत नसल्याची शोकांतिका त्यांनी व्यक्त केली. सीआरपीएफ चेतन चिता या जवानाची हिमंत आणि धाडसाचे कौतुक करीत त्याने लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चाळणी होवूनही १६ राऊंड फायर करत लढा दिल्याची शौर्यगाथा व्यक्त केली.सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी, तर आभार प्रतीक महाजन यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर