शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

पिंपळकोठे गावाला मोफत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:17 PM

रिंगणगावकरांचे औदार्य : टंचाईवर मात

एरंडोल : आजच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व जण पाणी मागत असताना रिंगणगाव, ता.एरंडोल ग्रामपंचायतीने मात्र आपल्या गावाचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवून आपल्या शेजारचे गाव पिंपळकोठे प्रा. चा. येथे भीषण पाणीटंचाई असल्याने त्या गावास मानवता व शेजारधर्म या नात्याने गेले दीड महिना झाले विनामूल्य पाणीपुरवठा करत आहे.या चांगल्या कामास सर्व रिंगणगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. वॉटर मॅन राजू डोखे यांच्या अथक मेहनतीने हा पाणीपुरवठा आजपर्यंत सुरू आहे.पिंपळकोठे गावाला जोपर्यंत पाणीटंचाई आहे तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा मानस रिंगणगावच्या सरपंच मृदुला कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. या कामासाठी पिंपळकोठे गावाच्या सरपंच गीताबाई गुजर, ग्रा.पं. सदस्य व ग्रमस्थांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान, रिंगणगाव ग्रामपंचायत आणि ग्रागस्थांचे या औदार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. शेजारधर्म पाळून या गावाने मानवतेच्या दृष्टिकोनातून मोठे काम केले आहे.जो पर्यंत पिंपळकोठे गावाला पाणी टंचाई आहे, तो पर्यंत पाणीपुरवठ केला जाईल.-मृदुला कुलकर्णी, सरपंच, रिंगणगाव, ता.एरंडोल.