जामनेर : शासनाने १८० तालुक्यात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर केली. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळदृश्य म्हणून जामनेर तालुका देखील घोषित झाला. तालुक्यातील तांत्रिक, व्यवसायिक, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक महाविद्यालयात ये जा करतात यावी यासाठी मोफत मासिक सोबत सवलत पास एसटी महामंडळाकडून वितरीत करण्यात आली.जामनेरचे आगार प्रमुख कमलेश धनराळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत एस.टी.पास देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मोफत पासेसचा फायदा तालुक्यातील सुमारे १४ हजार विद्यार्त्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पासेस वितरण कार्यक्रमाला आगार प्रमुख, कमलेश धनराळे, वाहतूक अधीक्षक गोपाल वाघ, एन. आर. शेरव, पी. जी. पाटील, एस. पी. पाटील, एस.के. चव्हाण, नीलेश बडगुजर उपस्थित होते.
जामनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पासचे वितरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 19:17 IST
जामनेरचे आगार प्रमुख कमलेश धनराळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत एस.टी.पास देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पासचे वितरण!
ठळक मुद्देएस.टी.कडून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा एस.टी.तर्फे ५५० विद्यार्थ्यांना वाटपजामनेर तालुक्यातील १४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ