शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात २५ हजार बीपीएलधारकांना मोफत वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 12:50 IST

सौभाग्य योजना

ठळक मुद्दे३९ हजार एपीएलधारकांनाही मिळणार लाभशहरात ७२५ जणांना मिळणार लाभ

सागर दुबेजळगाव : सौभाग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील २५ हजार ५५८ दारिद्रय रेषेखालील (बीपीएलधारक) लाभार्थी कुटुंबियांना महावितरणतर्फे मोफत वीज जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे़ एवढेच नव्हे तर दारिद्र्य रेषेवरील (एपीएलधारक) ३९ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबियांकडून १० महिने दरमहा ५० रुपये आकारण्यात येऊन वीजजोडणी देण्यात येणार आहे़प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना 'सौभाग्य' या योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील ६४ हजार १३४ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्यात येणार आहे. यातील २४ हजार ९४१ बीपीएल लाभार्थ्यांना विना शुल्क तर एपीएल धारकांना फक्त ५०० रुपयात वीज जोडणी देण्यात येईल़ एपीएलधारकांना दर महा ५० रुपये प्रमाणे १० महिन्यासाठी ५०० रुपये बिलांतून घेण्यात येणार आहे. यात महावितरण कंपनीकडून त्याठिकाणी लागणारी विद्युत यंत्रणा व साहित्य मोफत पुरविले जाणार आहे.दीड लाख वीज जोडणीचे उद्दीष्टसौभाग्य योजनेंतर्गत जळगांव परिमंडळात धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातून १ लाख ७० हजार १७५ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी १ लाख ४८ हजार ९३४ लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर २१ हजार २४१ लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे़वीज साहित्य मोफत पुरविले जाणारलाभार्थ्यांना वीजेसह वीज जोडणी देखील मोफत देण्यात येणार आहे़ त्यासाठी लागणारे विद्युत साहित्य अर्थात वीज मीटर, वायर तसेच पोल सुध्दा महावितरणतर्फे पुरविण्यात येणार आहे़ त्यामुळे एकही रूपया लाभार्थ्यांना भरण्याची गरज भासणार नाही़शहरात ७२५ जणांना मिळणार लाभसौभाग्य योजनेतंर्गत योजनेतंर्गत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांना वीज जोडणी करून मिळणार आहे़ यासाठी लाभार्थ्यांना एक रूपयाही खर्च करण्याची गरज पडणार नाही़ दरम्यान,मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आली आहे़ महावितरण कंपनीकडून सौभाग्य योजनेतंर्गत शहरातील ६१७ बीपीएलधारकांना मोफत तर १०८ एपीएल धारकांना ५०० रुपयात वीजजोडणी दिली जाणार आहे. ही योजना आजपर्यत वीज जोडणी न घेतलेल्या बीपीएल व एपीएलधारकांसाठी राबविण्यात येत आहे़

टॅग्स :electricityवीजJalgaonजळगाव