शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबांना होणार अर्सेनिक अल्बम-३० औषधाचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:00 IST

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढलेला असून दिवसेदिवस नवीन रुग्णाची त्यामध्ये भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम -३० ...

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढलेला असून दिवसेदिवस नवीन रुग्णाची त्यामध्ये भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम -३० या औषधामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबाना मोफत अर्सेनिक अल्बम -३० या औषधांचा पुरवठा स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे. या औषधांचे वाटप करणे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे आदी कामे स्वयंसेवकांमार्फत पुढील कालावधीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले.यावेळी निवड करण्यात येणाऱ्या स्वयंसेवक हा प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी असणार आहे़ तर तो स्वयंसेवक हा स्वयंस्फुतीर्ने काम करण्यास तयार असावा, त्याचे वय सर्वसाधारणपणे २५ ते ४० वर्षे या वयोगटातील असावा. त्याला कोणताही आजार नसावा, अशांची निवड केली जाणार आहे़ त्यातच सर्वसधारणपणे ५० कुटूंबासाठी एक स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. कुटूंबाची यादी तयार करतांना सलग घरे असलेली कुटूंब घेण्यात येणार आहे. या कुटूंबाशी परिचीत असलेली व्यक्तीच स्वयंसेवक म्हणून घेण्यात येणार आहे.अर्सेनिक अल्बम -३० या औषधाचे जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसिलदार यांना ५०-५० डब्यांचे बंडल करुन दिले जाणार आहे़ तहसिलदार हे त्याचदिवशी सदरची औषधे प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबांची संख्या विचारात घेवून प्रतिबंधित क्षेत्र अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करतील़ नंतर तो अधिकारी े प्रत्येक स्वयंसेवकास ५० बॉटल्स देतील. स्वयंसेवक त्यांचेकडे असलेल्या 50 कुटूंबियांना वाटप करतील. स्वयंसेवकांनी औषधांचे वाटप सुरु करण्यापुर्वी सॅनिटायझर ने हात स्वच्छ धुवायचे असुन मास्क घातल्याशिवाय कोणीही औषधांचे वाटप करावयाचे नाही, औषध वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची दक्षता स्वयंसेवकांनी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव