शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला ५४ हजार ग्राहकांना मोफत सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:29 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थितीत गरीब मजूर आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस (पीएमयुवाय) योजनेंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना तीन महिने लाभतीन महिन्यांपर्यंत मिळणार मोफत सिलिंडर

जामनेर, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थितीत गरीब मजूर आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस (पीएमयुवाय) योजनेंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, या निर्णयाचा लाभ तालुक्यातील सुमारे ५४ हजार ग्राहकांना मिळणार आहे. गारखेडा, नेरी, पहूर, शेंदुर्णीं, तोंडापूर, जामनेर, फत्तेपूर, लोहारा , बेटावद, वाकोद, जामनेरपुरा या भागात विविध कंपण्याचे गॅस वितरण करण्याचे ठिकाण आहे. तालुक्यात योजनेचे एकूण ५४ हजार लाभार्थी असून त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना एप्रिल ते जून २०२० यादरम्यान तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर वितरित करण्यात येणार आहे. तसेच एप्रिल महिन्यात सिलिंंडर खर्चाची रक्कम उज्ज्वला गॅस लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर ग्राहकाला सिलेंडर खरेदी करता येईल. ग्राहकाला दर महिन्याला एक सिलिंडर मिळणार आहे. शेवटचे सिलेंडर मिळाल्यानंतर १५ दिवसानंतर लाभार्थी ग्राहकाला पुढील सिलिंडर बुक करता येईल.चार हजार लाभार्थींच्या खात्यावर रक्कम?तालुक्यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जवळपास ५४ हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी चार हजार लाभार्थींच्या खात्यावर एप्रिल महिन्याची सिलिंंडर खर्चाची रक्कम जमा झालेली आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासनाने लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी लाभार्थी करीत आहे.लाभार्र्थींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. लाभार्थींनी ते पैसे काढून मोबाईलद्वारे गॅस बुकिंग करावी. घरपोच त्यांना सिलेंडर मिळणार असून, वितरित करणाऱ्यांकडे त्यांनी सिलिंडरचे पैसे देऊन सिलिंंडर घ्यावा.-अभिषेक पाटील, समर्थ गॅस एजन्सी, जामनेर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर