नेरी, ता. जामनेर : येथील केळी व्यापारी शेख रशीद शेख बशीर यांची उत्तर प्रदेशातील दोन फ्रुट कंपनीच्या मालककांनी मिळून एकूण १० लाख ९२ हजार ४११ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वृत्त असे की, नेरी दिगर शेख रशीद हे परिसरातील शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन बाहेर राज्यात विक्री करतात. गेल्या १ जून रोजी रशीद यांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील साईफ्रुट कंपनी आणि एनएफसी फ्रुट कंपनी यांना सुमारे ११ लाख रुपयांचा केळी माल विकला होता.या मालाचे पैसे वेळेत न मिळाल्याने शेख रशीद यांनी कंपनीच्या मालकांकडे तगादा लावला.वेळोवेळी संपर्क साधून पैशांची मागणी केली, मात्र मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ होत असून आपली फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच साईफ्रुट कंपनीचे मालक कमलेश यादव आणि एनएफसी फ्रुट कंपनीचे सुंदर यादव या दोघा आरोपींविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला शेख रशीद यांनी फिर्याद दिली.या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपींविद्ध भादवी कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, हेकॉ विनोद पाटील करीत आहे.
नेरी येथील केळी व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:04 IST