पारोळा : तालुक्यातील शिरसमनी येथील चौदावर्षीय मुलाचा गावातील सुधाकरनगर येथील साठवण बंधा-याच्या (केटीवेअर) पाण्यात पाय घसरल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली.येथील नरेश अनिल राठोड (वय १४) हा ६ रोजी दपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील पोपट निंबा शिंपी यांच्या सुधाकर शिवारातील शेताजवळील गवताचे ओझे साठवण बंधा-यात फेकण्यासाठी गेला होता. त्यावेळी चिखलात पाय घसरल्याने पाण्यात पडून बुडाला. त्यास बाहेर काडून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.योगेश साळुंखे यांनी मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसात सुनील देशमुख राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास किशोर पाटील करीत आहेत.
केटीवेअर बंधाऱ्यात पडून चौदावर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:19 IST