शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

एक हजाराची लाच प्रकरणात चाळीसगाव पं.स.च्या वरिष्ठ सहायकास चार वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:30 IST

वडीलांच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीची पेन्शन आईच्या नावाने वर्ग केल्याच्या कामाच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चाळीसगाव पंचायत समितीचा तत्कालीन वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला न्यायालयाने मंगळवारी ४ वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला.

ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल चाळीसगाव पंचायत समितीचे प्रकरणएक हजार रुपये दंड

जळगाव : वडीलांच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीची पेन्शन आईच्या नावाने वर्ग केल्याच्या कामाच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चाळीसगाव पंचायत समितीचा तत्कालीन वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला न्यायालयाने मंगळवारी ४ वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला.तक्रारदार सुनील पंढरीनाथ भामरे (रा.रांजणगाव, ता.चाळीसगाव) यांचे वडील पंढरीनाथ त्र्यंबक भामरे हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक होते. त्यांचा १६ जून २०१५ रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन आईच्या नावाने वर्ग करण्यासाठी सुनील भामरे यांनी चाळीसगाव पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक शांताराम निकम यांची भेट घेतली होती. ही पेन्शन आईच्या नावाने वर्ग करण्यासह बॅँकेकडे पत्रव्यवहार केल्याचा मोबादला म्हणून निकम यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. भामरे यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ आॅगस्ट २०१५ रोजी निकम यांना घाटे हॉस्पिटलच्या भींतीजवळ एक हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले होते.चार साक्षीदारांची तपासणी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात तक्रारदार सुनील भामरे, पंच चेतन सतीष जेधे, जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, तपासाधिकारी प्रभाकर निकम यांच्या साक्षी अत्यंत महत्वाच्या ठरल्या. अतिरिक्त सहायक सरकारी वकील भारती खडसे यांचा प्रभावी युक्तीवाद लक्षात घेता न्या.लाडेकर यांनी आरोपी निकम याला लाच मागणी केली म्हणून तीन वर्ष कारावास व एक हजार दंड तर लाच स्विकारली म्हणून ४ वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी सुनील सपकाळे व केसवॉच सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव