शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील लाचखोर तलाठ्याला चार वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:40 IST

सात बारा उताऱ्यावरुन नाव कमी करण्यासाठी घेतली होती लाच

ठळक मुद्देतिघांच्या साक्षीतील एक वाक्यता महत्वाचीसत्यजित नेमाने याची कारागृहात रवानगी

जळगाव : सात बारा उताºयावरुन बहिणीचे नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांंची लाच घेणारा पिंप्राळा येथील तत्कालीन तलाठी सत्यजित अशोक नेमाने याला न्या.पी.वाय. लाडेकर यांनी सोमवारी चार वर्षे कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लाच प्रकरणात जळगाव न्यायालयात प्रथमच चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार बाळू उत्तम सोनवणे (रा.सावखेडा बु.ता.जळगाव) यांनी सावखेडा शिवारात शेत गट क्र.२४ व २७ मधून बहिणीचे नाव कमी करण्यासाठी नोंदणीकृत हक्कसोड पत्र केलेले होते. सात बारा उताºयावरुन बहिणीचे नाव कमी करण्यासाठी अर्ज, नक्कल व इंडेक्स-२ असे कागदपत्र सोनवणे यांनी पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांच्याकडे दिले होते. त्यावरुन सात बारा कच्चा उताराही सोनवणे यांनी मागितला असता नेमाने याने दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.सोनवणे यांनी १७ फेब्रुवारी २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर तत्कालिन उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने पिंप्राळा तहसील कार्यालयात सापळा रचला असता नेमाने याने लाचेची रक्कम निवृत्त कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे यांच्याकडे देण्याचा इशारा केला होता. त्यानुसार रक्कम स्विकारताच कोतवाल व नेमाने या दोघांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.तिघांच्या साक्षीतील एक वाक्यता महत्वाचीन्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात तक्रारदार बाळू उत्तम सोनवणे, पंच गणेश गंभीर आळे (मनपा कर्मचारी) व तपासाधिकारी पराग सोनवणे या तिघांच्या साक्षी न्यायालयात झाल्या. त्यात तिघांच्या साक्षीत एक वाक्यता आल्याने न्यायालयाने नेमाने याला दोषी धरुन वेगवेगळ्या कलमाखाली अनुक्रमे चार व तीन वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी जोरदार युक्तीवाद केला.बचाव पक्षातर्फे अ‍ॅड.आर.के.पाटील यांनी काम पाहिले.असे कलम अशी शिक्षालाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ : तीन वर्ष कैद, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद. कलम १३ (१) सह १३ (२) : चार वर्ष कैद, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदसत्यजित नेमाने याची कारागृहात रवानगीतलाठी नेमाने याला शिक्षा सुनावल्यानंतर लगेच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. चार वर्षाच्या शिक्षेत जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करता येत नाही, त्यामुळे नेमाने याला उच्च न्यायालयातच अर्ज करावा लागणार आहे. निवृत्त कोतवाल उखर्डू सोनवणे यांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सक्षम अधिकारी म्हणून तत्कालिन प्रांताधिकारी अभिजीत भांडे पाटील यांचीही साक्ष झाली होती. पैरवी अनिल सपकाळे व शेख शफिक या दोघांचेही सहकार्य लाभले.

 

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव