शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

चिकन विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला करणा-याला चार वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:05 IST

चिकन न दिल्याने राग येऊन विक्रेत्यावर  कोयत्याने सपासप वार करणाºया पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड (३४, रा. करमाड, ता.जामनेर) याला  न्यायालयाने ४ वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी शनिवारी हा निकाल दिला.

ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल  अंडरट्रायल चालला खटला

जळगाव : चिकन न दिल्याने राग येऊन विक्रेत्यावर  कोयत्याने सपासप वार करणाºया पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड (३४, रा. करमाड, ता.जामनेर) याला  न्यायालयाने ४ वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी शनिवारी हा निकाल दिला.याबाबत अधिक माहिती अशी की, युनुस इस्माईल शेख (५०, रा.विटनेर, ता.जळगाव) यांचा चिकन, मटन विक्रीचा व्यवसाय आहे. २७ मार्च २०१८ रोजी युनुस व त्यांचा पुतण्या शेजाद शेख शरीफ हे करमाड, ता.जामनेर येथे व्यवसायासाठी गेले होते. सायंकाळी साडे पाच वाजता पिंटू गायकवाड हा चिकन घेण्यासाठी आला. मात्र तेव्हा कोंबड्या संपल्याने चिकन देता आले नाही,त्याचा राग आल्याने पिंटू याने घरातील कोयता आणून युनुस याच्या मानेवर, पोटावर सपासप हल्ला केला होता. तेव्हा पिराजी सोनवणे, सुभाष महाराज व अशोक महाराज यांनी भांडण सोडविले. पिराजी यांनी जखमी युनुस यांना दुचाकीवरुन पळासखेडा (मिराचे) गावापर्यंत नेले तेथून भाऊ शरीफ याने त्यांना जळगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे मध्यरात्री जखमीची जबाब नोंदविल्यानंतर दुसºया दिवशी जामनेर पोलीस स्टेशनला गायकवाड याच्याविरुध्द कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.१२ साक्षीदार तपासलेतपासाधिकारी उपनिरीक्षक सुनील बापू कदम यांनी ३ जून २०१८ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यात सरकारतर्फे बारा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात विठ्ठल श्यामराव माळी, जखमी युनुस शेख, राजू ताराचंद शिरसाठ, सुरेश हिरालाल राजपूत, डॉ.मनोज काशिनाथ पाटील, सुभाष मोहन ठाकरे, पिराजी सोनवणे, जगनसिंग राजपूत, जगदीश गोसावी, संदीप सूर्यंवशी व तपासाधिकारी सुनील कदम यांचा समावेश आहे. या खटल्यात सुभाष ठाकरे, पिराजी सोनवणे व जगन राजपूत हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. जखमी युनुस यांना स्वत:  जखमा न्यायालयात दाखल झाले. कोयत्यावरव आरोपीच्या पॅँटवर रक्ताचे डाग होते. ते युनुसचे असल्याचे निष्पन्न झाले होते. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे अ‍ॅड.ज्ञानेश्वर बोरसे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव