शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी चोरटा व एलसीबीत चकमक

By admin | Updated: July 31, 2014 15:03 IST

राजदत्त परब याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धुळे चौपदरी रस्त्या जवळ सापळा लावला. कारवाईची चाहूल लागल्यानंतर त्याने पळ काढल्याने पोलिसांनी तुफान दगडफेक केली.

जळगाव : मुंबई, ठाणे,नाशिक या शहरांमधून चारचाकी वाहनांची चोरी करून जळगावात विल्हेवाट लावल्या प्रकरणातील मुख्य आरोपी राजदत्त परब याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धुळे चौपदरी रस्त्या जवळ सापळा लावला. कारवाईची चाहूल लागल्यानंतर त्याने पळ काढल्याने पोलिसांनी तुफान दगडफेक केली. चांदवडपर्यंत पाठलाग केल्यानंतरदेखील आरोपी गुंगारा देण्यात यशस्वी झाला.

मोठय़ा शहरांमधून चारचाकी वाहनांची चोरी करून जळगाव जिल्ह्यात किशोर पाटील याच्या मार्फत विक्री केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक मुख्य आरोपीपर्यंत पोहचले आहेत.
ग्राहक म्हणून साधला संपर्क
पोलिसांनी आरोपी किशोर याला अटक केल्यानंतर मंगळवारी टोळीचा प्रमुख राजदत्त पी. परब याला फोन लावण्यास सांगितले. किशोरने राजदत्त याला फोन लावून एका चारचाकी घेण्यासाठी ग्राहक इच्छुक असल्याची माहिती त्याला दिली. त्यानुसार मुख्य आरोपी राजदत्त याचा मंगळवारी संध्याकाळी फोन आला. चारचाकी आपण धुळे फोर-वे वर घेऊन येत असल्याचे त्याने सांगितले.
स्थानिक गुन्हा शाखेने लावला सापळा
आरोपी राजदत्त याने पहाटे पाच वाजेच्या सुमारास किशोरला धुळे फोर-वे वर येण्यास सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे तीन पथक रवाना झाला. धुळे टोल नाक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर एका निर्जनस्थळी किशोरला थांबविले. बाजूला असलेल्या ट्रकच्या बाजूला दोन कर्मचारी आणि काही अधिकारी थांबून होते. आरोपी राजदत्त याला कारच्या खाली उतरविणे आणि त्यावर झडप टाकणे हा पोलिसांचा उद्देश होता.
पोलिसांची गाडी ओळखली
ठरलेल्या वेळी राजदत्त या ठिकाणी आला. मात्र किशोर ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी न थांबता तो थोडा पुढे जाऊन वळण घेण्यासाठी निघाला. या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व कर्मचारी आपल्या वाहनातून जात होते. राजदत्त याला संशय येऊ नये म्हणून रायते यांनी वाहन पेट्रोल पंपावर नेत ते काही वेळ थांबले व पुढे टोल नाक्यापर्यंत जाऊन वाहन वळविले. आरोपी किशोर यांच्या आजूबाजूला असलेले अधिकारी व कर्मचार्‍यांना रायते यांनी सतर्क राहण्याची सूचना केली.
चांदवडपर्यंत केला पाठलाग
आरोपी राजदत्त पळून गेल्यानंतर प्रभाकर रायते यांच्या वाहनाने त्याचा पाठलाग सुरू केला. या दरम्यान तो टोलनाक्यावरून जाईल अशी शक्यता गृहित धरून त्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. मात्र त्याने आडमार्गाने प्रवेश करीत चांदवडच्या दिशेने निघाला. पोलिसांनी चांदवडपर्यंत पाठलाग केल्यानंतरदेखील तो हाती न लागल्याने शेवटी निराश होऊन पथकाला माघारी यावे लागले.
राजदत्त ठाणे पोलिसांसाठी वॉण्टेड
मुख्य आरोपी राजदत्त परब याची स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पूर्ण कुंडली काढली आहे. एका बँकेत त्याने कागदपत्रे दिली होती. त्या आधारावर त्याचे नाव समोर आले आहे. आरोपी राजदत्त हा ठाणे जिल्हा पोलिसांना वॉण्टेड आहे. त्याने कारचोरी दरम्यान मुंबईमध्ये एक दोन ठिकाणी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी राजदत्त परब याच्या व्यतिरिक्त टोळीत काही सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव पोलिसांसोबतच मुंबई पोलीसदेखील त्याला ताब्यात घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. चोरीच्या चारचाकी वाहनांची विल्हेवाट लावणार्‍या टोळीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे तीन पथक नाशिक, धुळे व मुंबई येथे रवाना होणार आहेत. आरोपी किशोर ज्या कर्मचार्‍याकडून बनावट कागदपत्रे तयार करीत होता, त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. ज्या गॅरेजवरून किशोर याची राजदत्त याच्यासोबत ओळख झाली त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे. आणखी सहा चारचाकी ताब्यात दरम्यान, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात आणखी सहा गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आता जप्त केलेल्या चारचाकी वाहनांची संख्या २८ झाली आहे. आरोपी राजदत्त परब याची मोठी टोळी असल्याने त्याची अटक झाल्यानंतर मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. तीन पथके रवाना होणार अन् राजदत्त कारसह पळाला आरोपी किशोर ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी राजदत्त काही क्षणात पोहचला. आजूबाजूला लपलेले कर्मचारी तो खाली उतरण्यासाठी वाट पाहत होते. मात्र बराच वेळ झाला तरी तो कारच्या खालीच उतरत नसल्याने कर्मचारी हतबल झाले. आजूबाजूला पोलीस असल्याचे राजदत्त याच्या लक्षात आल्याने त्याने कार सुसाट पळविण्यास सुरुवात केली. हतबल पोलीस कर्मचार्‍यांनी त्याला रोखण्यासाठी त्याच्या कारवर तुफान दगडफेक सुरू केली. मात्र तब्बल १६0 च्या स्पीडने त्याने कार पुढे काढत तो पसार झाला.