शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एकाच खर्चात उडविला चार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:59 IST

नाथजोगी समाजाचा स्तुत्य उपक्रम

महिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : लग्न म्हटले म्हणजे बॅण्ड, मंडप, घोडा, जेवणावळ, अमाप खर्च, मानपान,आहेर, यातच वधूपिता किंवा वरपिता कर्जाचा डोंगर डोक्यावर करून घेतात. पण याला अपवाद ठरले ते महिंदळे येथील नाथजोगी समाजाने कमी खर्चात कशी लग्न होतात हे दाखवून दिले. १९ रोजी हे विवाह पार पडले.महिंदळे परिसरात नाथजोगी (भराडी) समाज वास्तव्यास आहे. यांचा मुख्य व्यवसाय म्हशी पाळून त्यांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात म्हशी घेऊन जातात व तेथेच राहतात. गावोगावी लोकगीते, समाज प्रबोधनपर गाणे म्हणून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यात मुला-मुलींचे लग्न म्हणजे अमाप खर्च. या अमाप खर्चास लगाम कसा घालता येईल हे समाजातील शिक्षित तरूणांनी हेरले व खर्चात बचत म्हणून एकाच मंडपात व एकाच वाद्यात चार लग्नांचा बार उडविला.विवाह सोहळ्याचे कोडकौतुकया लग्न सोहळ्यात परगावातील नवरदेव जमवून हे विवाह पार पडले. त्यात पंडित भिका पवार, बोरनार, ता.भडगाव यांचा चिरंजीव विकास, बापू रतन बाबर रोकडा फार्म यांचे चिरंजीव राजेंद्र, रमेश दगा पवार महिंदळे यांचे चिरंजीव दिलीप व रामदास परम शिंदे महिंदळे यांचे चिरंजीव दादाभाऊ यांचा विवाह सोहळा पार पडला.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व नाथजोगी समाज बांधव आबा शिंदे, धोंडू बाबर, आबा माळवे, पंडित बाबर, उत्तम भराडी, विलास भराडी, जगन्नाथ बाबर, समाधान भराडी, रवींद्र पवार यांचे सहकार्य लाभले.नाथजोगी समाजाचे अध्यक्ष कैलास पवार यांनी समाजाला एकत्र जमवून लग्नात होणारा अमाप खर्च कसा कमी होईल व एकाच खर्चात जास्तीत जास्त लग्न करायचा निर्णय घेतला व धूमधडाक्यात कमी खर्चात एकाच मंडपात चार लग्नाचा बार उडवला. यात प्रत्येक वरपित्याचे एक ते दीड लाख रुपये वाचले. १९ मार्च रोजी हा सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.