जळगाव : महसूलची अत्यल्प वसुली, सातबारा संगणकीकरण अद्ययावत न करणे आदी कारणांवरून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी चार तलाठ्यांना निलंबित केले आहे. हे चारही तलाठी अमळनेर तालुक्यातील आहेत. आर. जी. विंचूरकर, एन. जी. कोचुरे, पी. एन. खंबायतकर आणि जे. ए. जोगी यांच्यासह या महिन्यात अशाप्रकारे १५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
चार तलाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 04:00 IST