जळगाव : चिंचोली येथे सापांचा खेळ करणा:या गारुडय़ाकडून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकत्र्यानी शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास चार साप ताब्यात घेतल़े सापांची प्रकृती अशक्त असल्याने संवर्धनासाठी त्यांना दोन महिने दत्तक घेतले असल्याची माहिती वासुदेव वाढे यांनी दिली़ . चिंचोली गावात गारुडय़ाचा खेळ सुरू असून त्याच्या जवळ चार साप असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेला मिळाली़ याची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष आणि सर्पमित्र वासुदेव वाढे, जितेंद्र सोनवणे, योगेश गालफाडे, ऋषीकेश राजपूत, प्रदीप शेळके तत्काळ घटनास्थळी रवाना झाल़े गारुडय़ाची समज घालून वन विभागाच्या सहकार्याने त्याच्या जवळील चार साप ताब्यात घेतल़े
चार सापांची सुटका
By admin | Updated: October 10, 2015 01:20 IST