शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्यात येणा-या ४ लाखाच्या गांजासह ४ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:05 IST

मध्य प्रदेशातून जळगाव जिल्ह्यात येत असलेला चार लाख रुपये किमतीचा ३८ किलो गांजा, चार आरोपी व तीन दुचाकी असा ५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी आठ वाजता अडावद-चोपडा रस्त्यावरील गुळ नदीच्या पुलावर पकडला. हा गांजा व आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून सापळा लावला होता.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातून तस्करी  ‘एलसीबी’ने रात्रभर लावला गुळनदीच्या पुलावर सापळापोलीस निरीक्षकांनीच लावला सापळा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १६ :  मध्य प्रदेशातून जळगाव जिल्ह्यात येत असलेला चार लाख रुपये किमतीचा ३८ किलो गांजा, चार आरोपी व तीन दुचाकी असा ५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी आठ वाजता अडावद-चोपडा रस्त्यावरील गुळ नदीच्या पुलावर पकडला. हा गांजा व आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून सापळा लावला होता.अटक केलेल्यांमध्ये दिनेश सिताराम बारेला (वय २३), रबड्या सिताराम बारेला (वय २२ दोन्ही रा.कालीगुंडी, ता.वरला, जि.बडवाणी) शिवराम गिनसा पावरा उर्फ बरोडे (वय २३ रा.चाच-यापाणी, ता.वरला जि.बडवाणी) व सुरेश देवरा पावरा (वय २२ रा.गेरुघाटी, ता.वरला जि.बडवाणी) यांचा समावेश आहे. या चौघांविरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला अमली पदार्थाची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वत: निरीक्षकांनीच लावला सापळामध्यप्रदेशातून यावल व चोपडामार्गे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना या भागात अधिक लक्ष केंद्रीत करुन टोळीचा पर्दाफाश करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुराडे यांनी गांजाची तस्करी केव्हा व कोणामार्फत होते याची माहिती खब-यांमार्फत काढली. ही माहिती मिळाल्यानंतर स्वत:  कुराडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार मनोहर देशमुख, सतीश हळणोर, विनोद पाटील, अशोक चौधरी,रवींद्र गायकवाड, दत्तात्रय बडगुजर, रवींद्र चौधरी, सूरज पाटील, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, विलास पाटील, सुशील पाटील, रामचंद्र बोरसे,विनयकुमार देसले, जयंत चौधरी, शरद सुरळकर, अशोक पाटील व गफूर तडवी यांना सोबत घेऊन गुळ नदीच्या पुलावर शुक्रवारी रात्री सापळा लावला होता.एकाच वेळी आल्या तीन दुचाकीअडावदकडून चोपडाच्या दिशेने सकाळी आठ वाजता एकाच वेळी तीन दुचाकी आल्या असता निरीक्षक कुराडे यांनी त्या अडविल्या. एका दुचाकीवर दोन जण तर अन्य दोन दुचाकीवर प्रत्येकी एक जण होता व त्यांच्या मागे गोणीत १९ किलो गांजा असा ३८ किलो गांजा पकडण्यात आला. तीन दुचाकी, गांजा व चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.