शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा प्रकरणात जळगावच्या पोलिसासोबत आणखी चौघांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:17 IST

बनावट नोटा प्रकरणात जळगावचा पोलीस रविकांत वसंत पाटील (मुळ रा.वरणगाव, ता.भुसावळ) व वशिष्ट पुंडलिक जाधव (रा. टाकळी टें, ता.माढा, जि.सोलापूर) या दोघांसोबत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सिध्दू नाईकनवरे, प्रताप चंदनकर, दत्ता उपासे (तिन्ही रा.कोरुली, ता.पंढरपूर, जि.पुणे) व संजय रुपनवार (रा.साकारी, ता.इंदापूर जि.पुणे) अशी चौघांची नावे आहेत.

ठळक मुद्देतपासात अनेक बाबी उघडपोलिसासह दोघांच्या कोठडीत वाढ अटकेसाठी सोलापूर पोलिसांचे पथक रवाना

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, ३१  : बनावट नोटा प्रकरणात जळगावचा पोलीस रविकांत वसंत पाटील (मुळ रा.वरणगाव, ता.भुसावळ) व वशिष्ट पुंडलिक जाधव (रा. टाकळी टें, ता.माढा, जि.सोलापूर) या दोघांसोबत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सिध्दू नाईकनवरे, प्रताप चंदनकर, दत्ता उपासे (तिन्ही रा.कोरुली, ता.पंढरपूर, जि.पुणे) व संजय रुपनवार (रा.साकारी, ता.इंदापूर जि.पुणे) अशी चौघांची नावे आहेत.

नोटा छापण्यापासून तर वितरीत करण्यापर्यंत या चौघांनी या प्रकरणात काम केलेले आहे. तर काही जण प्रिंटर, कागद व अन्य साहित्य आणून देण्याचे काम करीत असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.त्यामुळे या चौघांनाही मंगळवारी आरोपी करण्यात आले.

दरम्यान, पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने रविकांत व वशिष्ट या दोघांना मंगळवारी माढा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुन्हा ३१ जानेवारीपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. रविकांत याच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती सोलापुर पोलिसांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना पाठविली आहे.

या गुन्ह्यात आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना आरोपी करण्यात आले आहे. या चौघांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. त्यांच्या अटकेनंतर आणखी काही बाबींचा उलगडा होऊ शकतो.

-पी.के.म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक, टेंभूर्णी पोलीस स्टेशन