शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांकडे चार लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:19 IST

रोख रक्कम व दागिने लांबविले; कुटुंब होते नाशिकला

जळगाव : नाशिक येथील मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या डॉ.बाळकृष्ण सोनू नेहते यांच्या गांधी नगरातील घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने मिळून चार लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. शुक्रवारी श्रध्दा कॉलनीतील नंदनवन कॉलनीत भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी झाल्यानंतर लागलीच शनिवारी ही घटना उघडकीस आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.बाळकृष्ण नेहते हे गांधीनगर येथे पत्नी प्रा.डॉ.अलका उर्फ गीता यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांची दोन्ही मुले अनुक्रमे डॉ.अमीत व डॉ. पराग नेहेते हे नाशिक येथे वास्तव्यास आहेत. या मुलांना भेटण्यासाठी नेहेते दाम्पत्य रविवार दि.२१ जुलै रोजी येथील घराच्या दरवाजाला कुलुप लावून नाशिक येथे गेले होते. त्यामुळे घर बंद होते.कंपाऊंडरच्या लक्षात आली घटनादवाखान्यातील कंपाऊंडर भिका महाजन हा शनिवारी सकाळी डॉ.नेहते यांच्या घराच्या आवारातील झाडांना पाणी देण्यासाठी आला असता त्याला लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा व कुलुप तुटलेले दिसले. त्याने ही माहिती शेजारी राहणारे दिलीप नारखेडे यांना दिली. नंतर नारखेडे यांनी डॉ.बाळकृष्ण नेहते यांना मोबाईलवरुन घटनेची माहिती दिली.त्यामुळे डॉ.नेहते तातडीने दुपारी जळगावला पोहचले. घरातील साहित्याची नासधूस झालेली होती. कपाटात ठेवलेले अडीच लाख रुपये रोख व दागिने असा चार ते साडे चार हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, डॉ.नेहते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनाही ठशांचे नमुने घेतले.

टॅग्स :Jalgaonजळगाव