शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रावेरचा सव्वा चार लाख रुपये किमतीचा लांबवलेल्या ट्रकसह चार आंतरराज्यीय चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 00:45 IST

चोरट्यांनी लांबवलेला ट्रक मध्य प्रदेशातील महू येथील किशनगंज पोलिसांच्या मदतीने रावेर पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्देन्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी रावेर पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

रावेर, जि.जळगाव : शहरातील सावदा रोडलगतच्या महाजन अ‍ॅक्सीडेंट हॉस्पिटलसमोरून चोरट्यांनी लांबवलेला सव्वाचार लाख रुपये किमतीचा ट्रक मध्य प्रदेशातील महू येथील किशनगंज पोलिसांच्या मदतीने रावेर पोलिसांनी जप्त केला असून, आंतरराज्यीय चोरट्यांच्या चांडाळ चौकडीला गजाआड केले आहे. उभय चोरट्यांना रावेर न्यायालयासमोर उभे केले असता दिवाणी न्यायाधीश आर.एल.राठोड यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस सूत्रांनुसार, शहरातील सावदा रोडलगतच्या महाजन अ‍ॅक्सीडेंट हॉस्पिटलसमोर शेख एजाझ शेख फैय्याज रा इमामवाडा (रावेर) यांनी उभा केलेला पांढरी कॅबीन व नॅशनल रंगाची बॉडी तथा सव्वा चार लाख रू किंमत असलेला ट्रक (एमएच-१९-सीवाय-२६०३) कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना दि.२७ आॅगस्ट रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदूर नजीकच्या महू शहरातील किशनगंज पोलिसांनी अबकारी अधिनियम ३४ (२), आर्म अ‍ॅक्ट २५ व २७ अन्वये दाखल गुन्ह्यात हा ट्रक जप्त करण्यात आला होता.त्या अनुषंगाने गुन्ह्याच्या तपासाची कडी उलगडताना हा जप्त ट्रक रावेरहून लांबवल्याची बाब उघड झाल्याने, रावेर पोलिसांशी संपर्क साधला. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सानप, पो कॉ सुरेश मेढे, पो कॉ तुषार मोरे यांनी मध्य प्रदेशातील किशनगंज पोलिसांशी संपर्क साधून हा ट्रक जप्त केला. या चोरीतील आरोपी सलीमशहा रमजानशहा (वय ५०, राजमहाल कॉलनी, माणिक ब्रीज इंदूर), अकील मोहंम्मद नबी मोहंम्मद (वय ३८, रा. गुलमोहर कॉलनी, हसद हैदरी रोड, धार, जि.धारणी), जितेंद्र कैलास धारेकर (वय ३४, रा.सोनिया गांधी नगर, इंदूर), नबाब आता मोहंम्मद मन्सरी (रा.लोखंडी गेट, गल्ली नं.५, चंदननगर, इंदूर) यांना पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी अटक केली आहे.या चौघाही आरोपींना मंगळवारी रावेर न्यायालयात हजर केले असता, दिवाणी व फौजदारी न्या.आर.एल.राठोड यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर