पहूर : क्षुल्लक कारणावरून सहा जणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना 17 रोजी रात्री घडली. याप्रकरणी पहूर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली. पेठमधील खाटीक गल्लीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक कुमावत याला शे.फहीम शे.कलीम म्हणाला की, तुझा मामा रस्त्यात पडला आहे. त्याला बाजूला कर, याचे वाईट वाटल्याने दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. त्या दरम्यान सागर बारी हा दीपकचा मित्र असल्याने त्यालाही मारहाण करून, डोके फोडून जखमी करण्यात आले. याप्रकरणी सागर लक्ष्मण बारी याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी शे.फहीम शे.कलीम, शे.रहीम शे.कलीम व त्याचा एक भाऊ यांच्याविरुद्ध भादंवि 324, 323, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुस:या फिर्यादीत शे.रहीम शे.कलीम यालाही आरोपी दीपक श्याम कुमावत, सागर लक्ष्मण बारी व एकनाथ सीताराम यांनी मारहाण केल्याचे शे.रहीम याने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून शे.फहीम शे.कलीम, शे.रहीम शे.कलीम, दीपक श्याम कुमावत, सागर लक्ष्मण बारी यांना शनिवारी मध्यरात्रीच अटक करण्यात आली. आणि रविवारी जामनेर न्यायालयात हजर केले असता त्यांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे शनिवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पहूर येथे हाणामारी, चार जणांना अटक
By admin | Updated: June 19, 2017 01:13 IST